Thursday, September 12, 2024
Homeदेश विदेशराज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंना अश्रू अनावर, म्हणाले...

राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंना अश्रू अनावर, म्हणाले…

दिल्ली | Delhi

राज्यसभेत मंगळवारी पेगॅसस (Pegasus Spyware) आणि कृषी कायद्यांवरुन (Agricultural Law) विरोधकांनी गदारोळ घातला.याचवेळी विरोधी पक्षातील काही खासदार (MP) वेलमध्ये जाऊन डेस्कवर चढले. पुढे त्यांनी आसनाच्या दिशेने नियमपुस्तिका फेकली. जय जवान जय किसानच्या घोषणा देत यावेळी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या गोंधळानंतर राज्यसभेचं (Rajya Sabha) कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं होतं.

- Advertisement -

या संपूर्ण घटनेनंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu) हे आज सभागृहात भावूक झाल्याचं पहायला मिळालं. बुधवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी झालेल्या गोंधळावर भाष्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी उभे राहून या गोंधळावर दु:ख व्यक्त केलं. इतकेच नाही तर त्यांनी म्हटलं, विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे मला रात्रभर झोप लागली नाही.

विरोधी पक्षातील खासदारांनी टेबलवर चढून गोंधळ घातल्याने आपली नाराजी जाहीर करताना ते म्हणाले की, “मला फार वाईट वाटलं, खूप दु:ख झालं… मात्र हे दु:ख व्यक्त करण्यासाठी काय करावं मला कळलं नाही कारण मी रात्रभर झोपलो नाही. हे सगळं घडण्यामागे नेमकं काय होतं हे मला समजत नाही आहे”.

दरम्यान राज्यसभेत गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर व्यंकय्या नायडू (M Venkaiah Naidu) कारवाई करणार आहेत. याच मुद्द्यावर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), सभागृह नेते पियूष गोयल (Piyush Goyal) आणि इतर भाजपा खासदारांनी (BJP MP) व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या