Friday, November 15, 2024
Homeनगरआम्ही जे बोललो त्याला शास्त्राचा आधार - महंत रामगिरी महाराज

आम्ही जे बोललो त्याला शास्त्राचा आधार – महंत रामगिरी महाराज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आम्ही जे बोललो त्याला शास्त्राचा आधार आहे. बांगलादेशात जी परिस्थिती झाली, तशी परिस्थिती आपल्याकडे होऊ शकते, याची कल्पना देऊन झोपलेल्या हिंदू समाजाला जागृत करण्याच्यादृष्टीने, आमचे आदर्श कसे असले पाहिजेत या संदर्भाने मी भाष्य केले असल्याची स्पष्टोक्ती सरला बेटाचे महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांनी दिली.

- Advertisement -

महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ श्रीरामपूर शहर व तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सकाळी सरला बेट येथे गेले होते. तेथे रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, शिवसेनेचे नेते प्रशांत लोखंडे, देविदास चव्हाण, आध्यात्मिक आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे संयोजक बबन मुठे, उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आसने, नगरसेवक दीपक चव्हाण, संजय यादव आदींसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, आदर्श जर चांगले नसतील तर समाज केव्हाही रसातळाला जाऊ शकतो. आम्हाला प्रवचनातून सर्व धर्मांबद्दल आदरच आहे. धर्मग्रंथातील वस्तुस्थिती मी समाजासमोर मांडली, हा घटनेने दिलेला अधिकार आहे. हिंदू समाज सहनशील आहे. हिंदुत्वादी संघटनांनी संयमाने, शांततेने कुठले गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महंत रामगिरी महाराज यांनी उपस्थितांना केले. याप्रसंगी प्रकाश चित्ते म्हणाले की, देशाची अखंडतेचा अविभाज्य घटक असलेल्या हिंदू समाजाला जागृत करणे गरजेचे आहे. महंत रामगिरी महाराज यांनी हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी भाष्य केले. महंत रामगिरी महाराज देशातले पहिले महंत आहेत की, ज्यांनी परमार्थाबरोबर हिंदुत्व आणि राष्ट्रवाद मांडला. यादृष्टीने सार्‍या हिंदू समाजाने रामगिरी महाराजांचे समर्थन केले पाहिजे, असे ते म्हणाले.

याप्रसंगी बाबा शिंदे, प्रशांत लोखंडे, बबन मुठे, सुरेश आसने, दीपक चव्हाण, शिवसेनेचे प्रदीप वाघ, प्राध्यापक श्री. वमणे आदींची महाराजांच्या समर्थनार्थ भाषणे झाली. याप्रसंगी बाळासाहेब गाडेकर, सोमनाथ पतंगे, रमेश सातपुते, महेश विश्वकर्मा, विशाल जाधव, देविदास वाघ, नारायण पिंजारी, काका शेलार, दादासाहेब कोकणे, अशोक कार्ले, सतीश कुदळे, डॉ. संजय नवथर, प्रवीण रोकडे, रवींद्र चव्हाण, विलास पाटणी, भास्कर सरोदे, अमोल साबणे, संदीप विश्वंभर, अक्षय नागरे, नितीन जाधव, मच्छिंद्र पांढरे, राजू शिंदे, कांतीलाल फुलवर, दत्ता पवार, किरण वूईके, नवनाथ पवार, सिद्धार्थ साळवे, विशाल त्रिवेदी, टायगर ग्रुप चे बबन जाधव, सचिन वायकर, पप्पू मोरे, नवनाथ लांडे, माऊली वेताळ, संदीप आदीक, बबलू दरेकर, प्रशांत अदिक, विशाल म्हस्के, अमोल आदीक, सोमनाथ दौंड, सागर जगताप, कुणाल सुर्यवंशी, सागर उपळकर, अमोल पवार, राहुल पवार आदींसह अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरला बेट येथे पोलीस बंदोबस्त वाढविला
सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी सिन्नर तालुक्यातील पांचाळे येथे हरिनाम सप्ताहात मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून मुस्लिम समाजात असंतोष आहे. महाराजांविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सध्या महंत बेटावर आलेले असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या