Saturday, May 4, 2024
Homeनगरमाजी मंत्री राम शिंदे यांना पितृशोक

माजी मंत्री राम शिंदे यांना पितृशोक

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे वडील स्व.शंकर बाप्पू शिंदे (वय 80) यांचे दुःखद निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते. जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात स्व. शंकर शिंदे यांनी जन्म घेतला होता त्यांनी वयाच्या 60 वर्षेपर्यंत हळगाव चौंडी व परिसरात सालकरी म्हणून काम केले.

एक प्रामाणिक शेतमजूर, सालकरी, ते कँबिनेट मंत्र्याचे वडील म्हणून नाव मिळवलेले मूलगा मंत्री झाला तरी कै शंकर शिंदे यांनी स्वतः मध्ये कोणताही बडेजाव ठेवला नाही. एक सामान्य माणूस म्हणून प्रत्येकाला आपुलकीने वागणूक दिली.

- Advertisement -

कै. शंकर शिंदे यांच्या निधनाची वार्ता कळताच जामखेड-कर्जत मतदारसंघ सह नगर जिल्हयात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात एक मूलगा माजी मंत्री प्रा.राम शिंदे, चार मुली, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे.

कै शंकर शिंदे यांचा अंत्यविधी रविवार दि 5 रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या मूळगाव जामखेड तालुक्यातील चौंडी येथे होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या