Friday, April 25, 2025
HomeनगरRam Shinde : पराभवानंतर राम शिंदेंचा अजित पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, "नियोजित...

Ram Shinde : पराभवानंतर राम शिंदेंचा अजित पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, “नियोजित कट होता, त्यात…”

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ( Maharashtra Assembly Elections) महायुतीचा (Mahayuti) एकहाती विजय झाला, तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) पराभवाचा सामना करावा लागला. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राम शिंदे यांचा काही मतांनी पराभव झाला. रोहित पवार यांचा केवळ १२४३ मतांनी विजय झाला.

- Advertisement -

दरम्यान, आज अजित पवार यांची आणि रोहित पवार यांची प्रीतीसंगमावर भेट झाली. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या व्यक्तव्यावरून भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी त्यांच्यावर गंभीर टीका केली. अजित पवार यांनी युतीधर्म पाळला नाही. मी नियोजित कटाचा बळी ठरलो. पवार कुटुंबियांमधील छुप्या युतीने करार केल्याने माझा पराभव झाला, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. यावेळी भर पत्रकार परिषदेत त्यांना त्यांच्या भावना अनावर झाल्या.

राम शिंदे म्हणाले, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्यावरून एक गोष्ट लक्षात आली आहे की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वीच त्यांच्यात कौटुंबिक अघोषित करार झाला होता. किंबहुना कर्जत-जामखेडसंदर्भात करार झाला होता. माझ्याविरोधात कट रचला गेला होता आणि मी त्या कटाचा बळी ठरलो आहे. मला आज त्याचा प्रत्यय आला.

तसेच, मी वारंवार महायुतीचा धर्म पाळण्यासंदर्भात वरिष्ठांकडे व अजित पवारांकडे मागणी करत होतो. परंतु, आज अजित पवार यांनी रोहित पवारांना स्वतःच सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं? याचा अर्थ हा नियोजित कट होता आणि त्या कटात माझा बळी गेला आहे. या सगळ्या राजकीय सारीपाटात मी बळी ठरलो आहे.

दरम्यान, यावेळी राम शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार आहात का? त्यावर शिंदे म्हणाले, मला माझ्या वरिष्ठांना, महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांना सुचवायचं आहे की हे सगळं महायुतीसाठी चांगलं नाही. माझ्यासाठी तर नाहीच नाही. यावर वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी माझी अपेक्षा आहे.

प्रीती संगमावर काय घडलं?

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आले होते. आमदार रोहित पवार हेही त्यांच्यासोबत होते. शरद पवार व रोहित पवार यांनी अभिवादन केल्यानंतर शरद पवार येथून मार्गस्थ झाले. तर रोहित पवार माध्यमांशी संवाद साधत होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रीतीसंगमावर दाखल झाले.

रोहित पवार प्रीतीसंगमाहून बाहेर पडत असताना अजित पवार आत येत होते. दोघे समोरासमोर येताच रोहित पवार अजितदादांच्या पाया पडले. त्यावेळी निवडून आल्याबद्दल अजितदादांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच ‘थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर तुला कळलं असतं’, असा मिश्किल टोला अजित पवार यांनी लगावला. त्यांच्या या वाक्यानंतर दोघेही दिलखुलास हसले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...