Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविधानपरिषद सभापतिपदासाठी भाजपकडून राम शिंदे आज अर्ज भरणार

विधानपरिषद सभापतिपदासाठी भाजपकडून राम शिंदे आज अर्ज भरणार

उद्या निवडणूक

नागपूर | Nagpur

गेली अडीच वर्षे रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतिपदाची निवडणूक उपसभापती डॉ. नीलम गो-हे (Neelam Gorhe) यांनी मंगळवारी जाहीर केली. त्यानुसार उद्या, गुरुवार, १९ डिसेंबर रोजी सभापतिपदासाठी निवडणूक (Election) होईल. यासाठी आज, बुधवारी (१८ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करता येईल. दरम्यान, सभापतीपदासाठी भाजपकडून राम शिंदे (Ram Shinde) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. ते आज सकाळी अर्ज दाखल करणार असून यामुळे, भाजपकडून राम शिंदे यांचे पुनर्वसन करण्यात येत असल्याचे दिसून येते.

- Advertisement -

आज विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच डॉ. गोन्हे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (Governor C.P. Radhakrishnan) यांच्या आदेशानुसार सभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. रामराजे नाईक-निंबाळकर यांची ७ जुलै २०२२ रोजी सदस्यत्वाची मुदत संपल्यापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. त्यामुळे राज्यपालांनी महाराष्ट्र विधान परिषद नियमातील नियम ६ मधील तरतुदीला अनुसरून सभापती निवडणुकीसाठी १९ डिसेंबर हा दिवस निश्चित केला असल्याचे डॉ. गोहे यांनी सांगितले. या निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याकड अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांनी आलेल्या अर्जाची छाननी करून अंतिम उमेदवार निश्चित केले जातील, असेही उपसभापती यांनी सांगितले.

YouTube video player

विधान सभापतिपदाची परिषद निवडणूक घोषित करताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) आमदार अॅड. अनिल परब यांनी डॉ. निलम गो-हे यांना अडचणीत आणले. डॉ. गोन्हे या सभापतिपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा असतानाच परब यांनी निवडणुकीचे निकष समजून घ्यायचे असल्याचे सांगत ज्यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्याचा अजूनही निकाल लागलेला नाही, असा संबंधित उमेदवार सभापतिपदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरू शकतो काय, अशी विचारणा त्यांनी केली. तर सभापतिपदाची मुदत २०२२ मध्ये संपली होती. त्यानंतर ही निवडणूक किती कालावधीमध्ये घेणे बंधनकारक आहे. दोन वर्षे निवडणुका झाल्या नसतील तर सभापतींची जागा रिक्त ठेवणे हे कायदेशीर आहे काय? याचाही खुलासा व्हायला हवा, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....