Tuesday, April 8, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRamdas Athawale: …तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते...

Ramdas Athawale: …तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते – रामदास आठवले

जळगाव | Jalgaon
संविधान तयार करण्यात सर्वांचे योगदान होते. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी स्वतः म्हटले आहे की, तुम्ही संविधानाचे शिल्पकार आहात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर अजून १० ते १५ वर्ष असते, तर ते पंतप्रधान झाले असते, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

रामदास आठवले म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात अनेक मुस्लीम मावळे होते. शिवाजी महाराजांनी हिंदू-मुस्लीम भेद केला नाही. पण, महाराष्ट्रात काहीजण आक्रमक भूमिका मांडत समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत उभा करायचा असेल, तर हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध, जैन, पारशी, लिंगायत या सर्व धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन आपला बंधूभाव वाढवला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फार मोठ्या कष्टाने संविधान लिहिले आहे. संविधानातील भारत उभा करायचा असेल, तर हिंदू-मुस्लीम वाद निर्माण होता कामा नये.”

- Advertisement -

पुढे ते म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये ९९ टक्के दहशतवादी हल्ले कमी झाले, त्यामुळे सद्यस्थितीत खूप शांतता आहे. काँग्रेसच्या काळात ३७० कलम हटवले असते तर अजून जम्मू काश्मीरमध्ये जास्त विकास झाला असता. केंद्र सरकारने वक्फ विधेयकात केलेले बदल हे मुस्लिम विरोधी नाही. तर मुस्लिमांना सधन करण्यासाठी आहे. मात्र विरोधकांकडून सातत्याने यासंदर्भात मुस्लिम समाजात गैरसमज निर्माण केले जात असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली.

“संविधान हे संविधान सभेत पास झाले आहे. परंतु, त्यात सर्वात मोठा वाटा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. संविधान आले की तिथे बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव येतेच. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा मसुदा डॉ. राजेंद्र प्रसाद आणि जवाहरलाल नेहरू यांना दिला, तेव्हा, त्यांच्या तोंडातून उद्गार निघालेले की, ‘बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत.’ बाबासाहेबांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष न देता संविधान लिहिले,” असे आठवलेंनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानात बदल करणारे नाहीत. पंतप्रधान मोदी सक्षम आहेत. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते असले तरी ते अनावश्यक ठिकाणी मुद्दे उपस्थित करून काँग्रेसची प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत. राहुल गांधी आहेत, तोपर्यंत आम्हाला चिंता नाही. कारण २०२९ मध्येही एनडीएचे सरकार येणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत आणि मीही मंत्री होईन, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ मध्ये झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अजून १० ते १५ वर्ष आपल्यात राहिले असते, तर ते देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते. परंतु, बाबासाहेब आपल्यातून लवकर निघून गेले,” असेही आठवलेंनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
ओझे | विलास ढाकणे | Oze मंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narahari Zirwal) हे सातत्याने रुग्णसेवेसाठी तत्पर असून त्यांनी नाशिक-मुंबईमध्ये (Nashik-Mumbai) स्वतंत्र रुग्णसेवकांची नियुक्ती करून गोरगरीब...