Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRamdas Kadam: आधी बाळासाहेबांच्या पार्थिवावर बोलून गेले; आता अंगाशी आल्याने कदमांची सारवासारव,...

Ramdas Kadam: आधी बाळासाहेबांच्या पार्थिवावर बोलून गेले; आता अंगाशी आल्याने कदमांची सारवासारव, म्हणाले, बाळासाहेब माझे…

मुंबई | Mumbai
शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे आता शिंदे गटाला मोठी किंमत चुकवावी लागण्याची चिन्हे आहेत. त्यांनी उध्दव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते की बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर दोन दिवस त्यांचे पार्थिव मातोश्रीमध्ये का ठेवले होते. उद्धव ठाकरेंचे काय अंतर्गत चालले होते, सगळे कळत होते. बाळासाहेबांच्या हाताचे ठसे कशासाठी घेतले होते? असे अनेक सवाल करत उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. मात्र, दोन दिवसानंतर रामदास कदम यांचा सूर काहीसा मवाळ झाला.

रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांनंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत रामदास कदमांनी केलेले आरोप फेटाळून लावले. शिवसेनेतील संजय राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधव, किशोरी पेडणेकर आदी नेत्यांनी रामदास कदम यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. तर अनिल परब यांनी थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्यातच शिंदे गटातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेण्याऐवजी हात वर केल्याचे पाहायला मिळाले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाचा मुद्दा काढला. यामुळे शिंदेसेनेचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

त्यानंतर रामदास कदमांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत भुमिका स्पष्ट केली. “बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत”, असे त्यांनी म्हटले. तसेच, दिवाळी होती, लोकांच्या घरातील कंदील विझता कामा नये. लोकांची दिवाळी चांगली साजरी व्हावी म्हणून मी दोन दिवस पार्थिव ठेवले, असे उद्धव ठाकरेंनी सांगावे. माझे काहीच म्हणणे नाही. हे जे तुम्ही आज सांगत आहात तेच महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे यांनी एकदा सांगावे. हेच माझे म्हणणे आहे. लोकांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून आम्ही दोन दिवस काढले असे त्यांनी सांगावे, असे म्हणत त्यांनी स्वतःच केलेल्या आरोपांवर सारवासारव केली आहे.

YouTube video player

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव दोन दिवस खोलीत का ठेवले? हा संशय मी व्यक्त केला आहे. त्यात गैर काय? माझी मागणी योग्य असेल तर त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील होते. अनिल परब माहिती देत आहेत. पण उद्धव ठाकरे का गप्प आहेत? मी उद्धव ठाकरेंना म्हटले होते की, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या पायांचे ठसे घेऊन ठेवा, ते आमचे दैवत आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मला त्यांनीच सांगितले की मी त्यांच्या हातांचे ठसे घेऊन ठेवले आहेत, असे देखील रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...