Tuesday, March 25, 2025
HomeनगरRamgiri Maharaj : रामगिरी महाराजांची सुरक्षा वाढवली; सराला बेटावर आरसीपी, बीएसएफचे जवान,...

Ramgiri Maharaj : रामगिरी महाराजांची सुरक्षा वाढवली; सराला बेटावर आरसीपी, बीएसएफचे जवान, पोलिसांचा मोठा फौजफाटा… नेमकं कारण काय?

श्रीरामपूर | प्रतिनिधी

‘हुजुर की शान मे गुस्ताखी बर्दाश नही करेंगे…चलो सराला बेट…, अशा आशयाची पोस्ट संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या सोशल माध्यमांवर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टनंतर प्रशासन सतर्क झाले आहे.

- Advertisement -

सराला बेटावर दंगा नियंत्रण पथक, बीएसएफ चे बंदूकधारी जवान, संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर रामगिरी महाराजांचा भक्त परिवारही मोठ्या संख्येने सराला बेटावर उपस्थित आहे. रामगिरी महाराज मात्र आपल्या दैनंदिन कीर्तन कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, महंत रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी थेट अल्पसंख्याक समाजावर टीका केली आहे. तसेच, रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत हिंदू जागरण मेळाव्याच्या माध्यमांतून नितेश राणे यांनी वादग्रस्त विधाने केली होती.

यानंतर सोलापुरातील कम्युनिस्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी अल्पसंख्यांक मेळाव्यातून आमदार नितेश राणे आणि रामगिरी महाराजांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, यंदा निवडणुकीत निवडून आल्यावर रामगिरी महाराजांना बेड्या घातल्या नाही तर मला आडम मास्तर म्हणू नका, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...