Saturday, October 12, 2024
Homeमुख्य बातम्यारामकुंड काँक्रीटीकरण प्रश्न: स्मार्ट सिटीची चालढकल, पूरोहित संघाचा विरोध

रामकुंड काँक्रीटीकरण प्रश्न: स्मार्ट सिटीची चालढकल, पूरोहित संघाचा विरोध

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रामकुंडाच्या (ramkund) तळाचे काँक्रीटीकरण (concretization) काढण्यावरुन नवा वाद समोर येऊ लागलेला असून, स्मार्टसीटीकडे (SmartCity) पूरोहीत संघांने काँक्रीट (Concrete) काढूनये यासाठी निवेदन (memorandum) दिले आहे.

- Advertisement -

मात्र त्याच वेळी गोदाप्रेमींच्या वतीने न्यायालयातून हे काँक्रीट काढण्यासाठी पाठपूरावा करणार्‍या देवांग जानी यांनी निवेदनाने नव्हे तर कोर्टातून या कामाला स्टे आणण्याचे आवाहन केले आहे. प्रत्यक्षात रामकुंडातील काँक्रीट काढण्यासाठी देवांग जानी हे 8 वर्षांपासून न्यायालयात लढा देत आहेत. न्यायालयाच्या तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर न्यायायाने या प्रश्नावर मनपा आयुक्त (Municipal Commissioner), जिल्हाधिकारी (Collector) व पोलिस आयुक्तांची (Commissioner of Police) त्रीसदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले.

या समितीने निरी व जीएसडीसी (GSDC) यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पहाणी करुन वस्तूनिष्ट अहवाल मागवला होता. त्यात निरीने र्कांक्रीट काढण्याचा अहवाल देत पाण्याची गती वाढण्यास मदत होईल असा रिपोर्ट दिला आहे. स्मार्टसीटीच्या (SmartCity) मिनीसमध्ये उल्लेख असल्याचे देवांग जानी यांनी सांगितले. तर जीएसडीसीने अहिल्याबाई होलकर पूलाजवळ (Ahilyabai Holkar Bridge) तपासणी करण्यासाठी बोअर मारला त्याला दिड इंची पाणी लागले. हे सकारात्मक असल्याचा अहवाल त्यांनी दिला असल्याचे देवांग जानी यांनी सांगितले.

त्याच वेळी नदी सूशोभित करण्याच्या भूमिकेतून स्मार्टसिटी कंपनीने (SmartCity Company) रामकुंडासह विविध 16 कुंडामध्ये नदीच्या तळाला काँक्रीटीकरण (concretization) केले. त्यामुळे नदीच्या तळातून पाझरणारे जिवंत जल स्त्रोत बंद झाले. त्यामुळे नैसर्गिक प्रक्रियेतून रामकुंडातील पाणी हे शुद्ध होण्याऐवजी दूषित राहू लागले आहे या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रेमी जनतेने नदीपात्रातील काँक्रिटीकरण काढण्याची मागणी गोदाप्रेमी व देवांग जानी यांनी सातत्याने लावून धरलेली होती.

निळकंठेश्वर मंदिराच्या पायर्‍या परिसरात काँक्रिटीकरण काढताना पाण्याचे झरे वाहताना दिसून येत आहेत गोदावरीच्या अंगभूत असलेले झरे काँक्रिटीकरणामुळे बंद झाले असल्याचा दावा खरा ठरला असून, जूने स्त्रोत पुन्हा जिवंत करण्यात यावे व गोदावरीच्या तळातून येणार्‍या गुप्त नद्यांना पुन्हा सक्रिय करण्याची मागणी गोदावरी प्रेमी देवांग जानी यांनी लावून धरली होती.

पूरोहित संघाची मागणी

स्मार्ट सिटीने येथील काँक्रीट न काढता रामकुंडातील परिस्थिती जैसे थे ठेवण्याची मागणी निवेदन द्वारे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी स्मार्ट सिटी कडे निवेदनाद्वारे केली आहे.काँक्रीटमुळे रामकुंडात स्नान करणार्‍या भाविकांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. तसेच वाहून जाणार्‍या भाविकांचे प्राण सहजपणे वाचवता येत असल्याचे यावेळी सतीश शुक्ल यांनी सांगितले.

या सर्व बाबींचा विचार करता स्मार्ट सिटीने रामकुंड परिसरातील तळ काँक्रीट न काढता जैसे थे ठेवण्यासाठी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे याची भेट घेऊन निवेदनाद्वारे केल्याचे सतीश शुक्ल यांनी सांगितले.पुरोहित संघ, कल्पना पांडे, रामकुंडावरील जीवरक्षक दल यांनी देखील स्मार्ट सिटीला निवेदन दिले असल्याचे वृत्त आहे.

रामकुंडाच्या परिसरात विविध उपनद्यांचा उगम होतो. त्यांच्या प्रवाहाला रोखण्यासह पाण्याच्या शुध्दिकरणाची एको सिस्टिमच संपवल्याने पाणी दूषीत होते. गोदावरी नदीवर गंगापूर धरण 1956 साली बांधले आहे. त्यापूर्वी नदीला मोठा प्रवाह होता. त्मुळे त्यापूर्वी नदी पात्रात काँक्रीट टाकणे शक्य नव्हते. कोणालीही काँक्रीट काढण्याबाबत तक्रार असल्यास त्यांनी निवेदन देऊ नये तर न्यायालयीन प्रक्रियेतून यावर स्टे घ्यावा.

-देवांग जानी, गोदाप्रमी व याचिकाकर्ता

ज्याठिकाणी काँक्रीट काढले त्याठिकाणी माणसे वाहून गेली असून, याला जबाबदार कोण? 1954 मध्ये कॉक्रीटीकरण करताना त्यावेळी विरोध का नाही केला. स्नान करताना भाविकांच्या पायाला काचा व खडे रुतून इजा होते. दुतोंड्या मारुतीच्या पुढे नदीपात्रात बांधलेला घाट कुंभमेळ्यात स्नानासाठी होणार्‍या गर्दीचे विभाजन करण्यासाठी बांधला होता. आता तो तोडल्याने आगामी कुंभमेळ्यात मोठा परिणाम होणार आहे.

-सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ

- Advertisment -

ताज्या बातम्या