Thursday, April 3, 2025
Homeनगररामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराचे चारही गेट खुले करा; साईभक्तांची मागणी

रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराचे चारही गेट खुले करा; साईभक्तांची मागणी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबांच्या हयातीपासून सुरु असलेल्या रामनवमी उत्सवाचे यंदा 114 वे वर्ष असून या तीन दिवसीय उत्सवासाठी साई संस्थान प्रशासनाने जय्यत तयारी केली असून यासाठी जगभरातून तीन लाख भाविक शिर्डीत दाखल होणार असल्याचा अंदाज संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिला असून त्यानुषंगाने संभाव्य गर्दी लक्षात घेता साई मंदिराचे चारही गेट भाविकांसाठी खुले करण्यात यावेत अशी मागणी साईभक्तांनी केली आहे.

- Advertisement -

शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या प्रमुख उत्सवापैकी एक असलेल्या रामनवमी उत्सव मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या कारकिर्दीत ऐतिहासिक होण्यासाठी साई संस्थान प्रशासनाच्यावतीने सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्यासह कर्मचारी मेहनत घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रथमच मुंबई वरून पायी चालत आलेल्या साई पालखीचे स्वागत सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथे केले. यावेळी श्री गाडीलकर यांनी स्वतः पालखी ओढत आपली सेवा प्रदान केली. साई मंदिराचे चारही दरवाजे खुले काण्यात यावे यासाठी अनेकदा शिर्डी ग्रामस्थ त्याचबरोबर साईभक्तांनी वेळोवेळी मागणी केली आहे. तर याच प्रवेशद्वारावर मंदिर परिसरात सोडण्यावरून साईभक्त आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात वाद झाले आणि त्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याचे आपणास पाहावयास मिळाले आहे.

मागे ग्रामस्थांनी मंदिराचे चारही प्रवेशद्वार खुले करावे यासाठी आंदोलन केले. त्यावर साईबाबा संस्थान प्रशासनाने सकारात्मकता दर्शवत आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही चारही दरवाजे पूर्ण क्षमतेने खुले झाले नाही. आता 6 एप्रिल रोजी होणार्‍या रामनवमी उत्सवासाठी सात लाख भाविकांना आमंत्रित केले असून यामध्ये तीन लाख भाविक उपस्थित राहणार असल्याने मंदिर परिसरात भाविकांना कोणत्याही गेटने जात यावे यासाठी चारही गेट खुले करून द्यावे, अशी मागणी शिर्डी ग्रामस्थ यांच्यासह साई भक्तांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : साधूच्या वेशात येवून तिघांनी दागिने पळविले

0
उंबरे |वार्ताहर| Umbare साधूच्या वेशात आलेल्या तीन भामट्यांनी एका महिलेला भुरळ पाडून घरातील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे...