Wednesday, May 29, 2024
Homeनगररांजणगाव देशमुख येथील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

रांजणगाव देशमुख येथील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Ranjangav Deshmukh

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू आहे. या उपोषणास पाठिंबा म्हणून कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील दोन युवकांनी रविवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. रवींद्र नवनाथ वर्पे व वैभव गोरक्षनाथ खालकर हे उपोषणास बसले आहेत. मंगळवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता. उपोषणकर्त्यांची शरारातील साखरेचे प्रमाण दररोज कमी होत असून त्यांचे वजनही कमी झाले आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. मंगळवारी रांजणगाव देशमुखसह परीसरातील गावे बंद ठेवून उपोषणास पाठिंबा देण्यात आला. या वेळी महिलांनी आरक्षण मिळत नाही म्हणून संताप व्यक्त करत प्रसंगी हातात लाटणे घेऊन रस्त्यावर उतरु,असा इशारा देण्यात आला.

- Advertisement -

उपोषणकर्त्यांची पोहेगावचे आरोग्य अधिकारी डॉ. तुपे व सहकार्‍यांनी तपासणी केली. मात्र उपोषणकर्त्यांनी उपचार करून घेण्यास नकार देत त्यांना दिलेली औषधे परत केली. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे व मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील उपोषण सोडत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असे या युवकांनी यावेळी सांगितले. उपोषणस्थळी दिवसभर विविध संघटनांनी भेट देत मराठा आरक्षणास आपला पाठिंबा व्यक्त केला. शासनाने मराठा समाजाचा अंत पाहू नये. तातडीने आरक्षण द्यावे. सरसगट सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आम्ही शांततेत आंदोलन करत आहे. आरक्षण नसल्यामुळे शिक्षण व नोकर्‍यांपासून हुशार असूनही आमची मुले आज घरी आहेत. आता माघार नाही,असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या