Sunday, March 30, 2025
Homeमनोरंजनरणवीर सिंह-रोहित शेट्टी या जोडीच्या 'सर्कस'ची घोषणा

रणवीर सिंह-रोहित शेट्टी या जोडीच्या ‘सर्कस’ची घोषणा

मुंबई | Mumbai

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) ही जोडी सूर्यवंशी चित्रपटानंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. नुकत्याचा या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

विलियम शेक्सपीयर चे गाजलेले नाटक ‘द कॉमेडी ऑफ एरर्स’ यावर आधारित ‘सर्कस’ (Cirkus) असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात रणवीरसह पूजा हेगडे (Pooja Hegde) आणि जैकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) देखील प्रमुख भूमिकेत दिसतील.

या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यात मुंबईत सुरु होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणवीर, पूजा आणि जैकलीन हे त्रिकूट प्रथमच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हा एक विनोदी चित्रपट असणार आहे. याची निर्मिती टी-सीरिज चे भूषण कुमार आणि रोहित शेट्टी करणार आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट बनविण्यात येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

रणवीर आणि रोहित शेट्टी ची ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट यंदा मार्चमध्ये रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र आता सिनेमागृहे सुरु झाल्याने लवकरच या चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा केली जाईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध तर काहींचा...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi येथील साईबाबांच्या मुळ चर्म पादुका साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 10 एप्रिलपासून दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात पादुका दोन...