Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्र'लाडकी बहीण योजने'चे फॉर्म 'मविआ'च्या कार्यकर्त्यांकडे देऊ नका; रावसाहेब दानवेंचे आवाहन

‘लाडकी बहीण योजने’चे फॉर्म ‘मविआ’च्या कार्यकर्त्यांकडे देऊ नका; रावसाहेब दानवेंचे आवाहन

मुंबई | Mumbai

लाडकी बहीण योजनेचा वापर करून महायुती सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याने महिलांनी या योजनेचे फॉर्म विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे न देता थेट सरकारी यंत्रणेकडे द्यावेत, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले. आगामी विधानसभा निवडणूक महायुती (Mahayuti) म्हणूनच लढणार आणि जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हे देखील वाचा : विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील; राष्ट्रवादीच्या आमदाराचे मोठे विधान

भारतीय जनता पार्टीच्या (BJP) प्रमुख नेत्यांच्या १८ आणि १९ जुलै रोजी पार पडलेल्या दोन दिवसीय बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक (Vidhansabh Election) ही महायुती म्हणून एकत्रितरित्या लढण्याबाबत चर्चा करण्यात आली. विधानसभेच्या सर्वच्या सर्व २८८ जागांबाबत चर्चा झाली. कोणी किती जागा लढायच्या याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांचे वरिष्ठ योग्यवेळी घेतील, असेही रावसाहेब दानवे यांनी नमूद केले. तसेच महायुतीत एकसंधपणा असताना महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचे वारंवार दिसून येत आहे अशी टीकाही दानवे यांनी केली.

हे देखील वाचा : संपादकीय : २० जुलै २०२४ – वाचन सवयीच्या दिशेने टाकलेले पाऊल

मविआतील तिन्ही प्रमुख घटकपक्षांचे नेते तर भावी मुख्यमंत्री (CM) म्हणून आपापल्या पक्षाच्या नेत्यांची नावे घेत आहेत. सर्वांनाच मुख्यमंत्री बनण्याची घाई झाल्याचे दिसून येत असून आघाडीतील बिघाडीचे दर्शन आत्तापासूनच जनतेला घडत आहे. आघाडीतील ही बिघाडी काही आत्ताची नव्हे तर सांगलीच्या जागेवरून मविआमध्ये झालेला वादंग लोकसभेवेळी दिसला आहेच असेही रावसाहेब दानवे म्हणाले. मविआमध्ये आलबेल नसताना त्यांच्यावर मतदारांनी विश्वास तरी कसा ठेवायचा असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हे देखील वाचा : UPSC चे अध्यक्ष मनोज सोनींचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

महायुती सरकार जनहितासाठी झटून काम करत असून विधीमंडळाच्या अधिवेशनात शेतकऱ्यांची वीजबिल माफी, लाडकी बहीण, भावांतराप्रमाणे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देणे हे आणि असे अनेक लोककल्याणकारी निर्णय घेण्यात आले असेही दानवे यांनी नमूद केले. महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर चहुबाजूंनी टीका करत असलेले मविआ चे नेते मात्र त्या त्या मतदारसंघात फलकबाजी करून महायुती सरकारच्या योजनांचे श्रेय लाटण्याचा हीन प्रयत्न करत असल्याची प्रखर टीकाही रावसाहेब दानवे यांनी केली. तसेच अशी दुटप्पी भूमिका असलेल्या मविआच्या घटकपक्षांपासून सावध रहा आणि सरकारी यंत्रणेतूनच लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरा असे आवाहनही त्यांनी केले.

हे देखील वाचा : अधिकार्‍यांचा दृष्टीकोन यापुढे संपूर्ण सरकारी असला पाहिजे – गृहमंत्री अमित शाह

दरम्यान, भाजपच्या पुण्यात रविवारी होणाऱ्या अधिवेशनाला पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते आणि नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मार्गदर्शन करणार असल्याची माहितीही दानवे यांनी दिली. तसेच महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणे आणि राज्यात पुन्हा महायुती सरकार आणण्याचा निर्धार कार्यकर्ते या अधिवेशनात करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या