Tuesday, May 21, 2024
Homeनगरदेशाची एकता व अखंडतेसाठी एकोपा ठेवा - झा

देशाची एकता व अखंडतेसाठी एकोपा ठेवा – झा

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा पोलीस ठाण्याच्यावतीने शनिवार 22 जुलै रोजी नेवासा शहरात धडक कृती दलाने (रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स) पथसंचलन केेले. शिस्तबद्ध निघालेल्या पथसंचालनाने सर्वांनाच आकर्षित केले. देशाच्या एकता व अखंडतेसाठी एकोपा ठेऊन काम करा, एकमेकांशी भाईचारा ठेवा असे आवाहन धडक कृती दलाचे वरिष्ठ अधिकारी अलोककुमार झा यांनी यावेळी केले.

- Advertisement -

आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर नेवासा पोलीस दलाच्यावतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून धडक कृती दलाचे वरिष्ठ अधिकारी अलोककुमार झा व नेवाशाचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करण्यात आले.पथसंचलनाच्या आधी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात श्री. झा यांचय अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक झाली.

यावेळी रॅपिड ऍक्शन फोर्सच्याअधिकारी अर्चना कुमारी, सुशीलकुमार, एल. असाहरी, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विजय भोंबे, मनोज मोढवे, गोपनीय शाखेचे जयवंत तोडमल उपस्थित होते.

सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांचे स्वागत केले.शहर व तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती व धार्मिक स्थळांच्या बाबत त्यांनी प्रास्ताविकात माहिती दिली.

अलोककुमार झा यांनी उपस्थित पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. शहरातील सद्य परिस्थितीबाबत गफूर बागवान, असिफ पठाण, बालेंद्र पोतदार, राजेंद्र मापारी, अ‍ॅड. जावेद ईनामदार, इम्रान दारुवाले यांनी येथील होणारे सण व इतर कार्यक्रमाची माहिती दिली.

अलोककुमार झा म्हणाले की आपल्या सर्वांना स्वातंत्र्य मिळाले आहे. जीवन कसे जगावे याचे स्वातंत्र्यही आपल्याला आहे म्हणून इतरांना कमी लेखणे, त्यांचा द्वेष करणे हे चुकीचे आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ देऊ नका असे आवाहन केले.

स्वतःमध्ये केलेले परिवर्तन हे आपल्या कुटुंबाला ही परिवर्तीत करते त्यामुळे आपण स्व:त चांगले वागणे व आचरण करणे गरजेचे आहे त्यामुळे देश ही बदलेल असे सांगून त्यांनी जगात मानवता धर्म मोठा असून त्याचे पालन करा,अराजकतेला रोखा व एकोप्याच्या माध्यमातून देशाच्या एकता व अखंडता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले.

यावेळी संजय सुखदान, गफूर बागवान, शांताराम गायके, ऋषभ तलवार, सतीश गायके, भाजपचे निरंजन डहाळे, अजित नरुला, असिफ पठाण, राजेंद्र मापारी, विकास चव्हाण, दिलीप गायकवाड, अ‍ॅड.फरदिन पठाण, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गव्हाणे, दादा देशमुख, सुलेमान मणियार, हारुण जहागीरदार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य श्रीरामपूर रोडवरून खोलेश्वर गणपती चौक, नगरपंचायत चौक, वाखुरे चौक, नाईकवाडपुरा, श्रीराम मंदिर कोर्ट गल्ली या भागात पथसंचलन करण्यात आले. ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिर प्रांगणात पथसंचलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी देवस्थानच्या वतीने अलोककुमार झा यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या