Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रWeather Updates : राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, राज्यातील अनेक शहरांचा पारा घसरला

Weather Updates : राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, राज्यातील अनेक शहरांचा पारा घसरला

मुंबई | Mumbai

राज्यात साधारण दिवाळीनंतर डिसेंबरपासून थंडीची चाहूल लागते. यावर्षी मात्र, तुलनेने लवकर थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात अनेक शहरांत थंडी जाणवू लागली आहे.

- Advertisement -

साधारण आठवडाभरपूर्वीपर्यंत नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते, पण आता राज्यातील अनेक भागांत तापमानात मोठी आणि वेगाने घसरण होत आहे. राज्यातील सर्वत्र तापमान २ ते ४ अंश सेल्सियसने घसरले आहे.

तापमानात मोठा फरक पडला असून येत्या काही दिवसांमध्ये पारा आणखी घसरणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नागपूर या शहरांमध्ये रात्रीच्या तापमानात घसरण सुरू झाली आहे.

महाराष्ट्राच्या काही भागांत उत्तर भारतातील थंड भागातून ईशान्येचे वारे येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी तापमानात घट होईल. साधारणपणे पुढील आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या