Wednesday, October 23, 2024
Homeभविष्यवेधरास : वृषभ, जुलै/ऑगस्ट राशी भविष्य

रास : वृषभ, जुलै/ऑगस्ट राशी भविष्य

जुलै – 2024

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी- गुरू-हर्षल, द्वितीयात रवि-शुक्र, तृतीयात बुध, पंचमात केतू, नवमात प्लूटो, दशमात- शनि, लाभात राहू-नेपच्यून, व्ययात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे. लग्नी गुरू आहे. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील.व्यक्तीमत्व प्रभावशाली होईल. संसारात फार चातुर्याने वागाल. उत्तम मित्र मिळतील. धार्मिक ग्रंथ वाचण्याची आवड वाटेल. शरीर प्रकृती चांगली राहील. नावलौकीकात भर पडेल. कायद्याबाहेर जाणे आवडणार नाही. वाढत्या वयामध्ये शरीर स्थूल होऊ नये यासाठी चालण्याचा व्यायाम करावा. वरिष्ठांच्या कृपेने उच्चपदाची प्राप्ती होईल. हाताखालच्या लोकांकडून काम करून घेण्याची कला अवगत होईल. स्वभाव सरळ राहील. विद्याव्यासंगात रस घ्याल. न्यायी व समतोल स्वभावमुळे लोकप्रियता वाढेल. राजकारण्यांना याी प्रचिती येईल. दशमस्थानी शनी आहे. भाग्याचे दरवाजे उघडतील. आपल्या बुद्धीमत्तेने सर्वांना चकीत कराल. ज्यामूळे जनमानसात आदर निर्माण होईल. आर्थिक आवक उत्तम राहील. धाडसाने कामे कराल.

स्त्रियांसाठी – द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

विद्यार्थ्यांसाठी -विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा– 6, 7, 8, 11, 12, 14, 15, 19, 21, 22, 23, 25, 26, 28


ऑगस्ट – 2024

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी-मंगळ-गुरू-हर्षल, तृतीयात रवि, चतुर्थात बुध-शुक्र, पंचमात केतू , नवमात प्लूटो, दशमात शनि, लाभात राहू- नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.
चतुर्थस्थानी आनंदी वृत्ती राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. न्यायीपणामुळे लोकप्रियतेत भर पडेल. आपल्या कार्यात प्रविण्य संपादन कराल. मधुर बोलण्यामुळे घरात व बाहेर खेळीमेळीचे वातावरण राहील. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. मातेची सेवा कराल. नवीन वाहन खरेदीचा विचार असल्यास हा महिना वाहन खरेदीसाठी उत्तम आहे. राजकारणी लोकांना जनतेकडून सन्मान मिळेल. निवासस्थानासंबंधी काही शुभ घटना घडतील. तनुस्थानी हर्षल आहे. धाडसाकडे कल राहील. स्वभाव कमालीचा लहरी व चंचल राहील. राजकारणात असाल तर भाषणातून श्रोत्यांवर आश्वासनांचा पाऊस पाडाल. मात्र श्रोतेगण त्यावर किती विश्वास ठेवतील असे नाही.

स्त्रियांसाठी – चतुर्थस्थानी शुक्र आहे. महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे राहील. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी– तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 6, 7, 9, 01, 15, 18, 20, 21, 23, 27, 29

- Advertisement -

सौ. वंदना अनिल दिवाणे

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या