Monday, May 20, 2024
Homeभविष्यवेधआजचे राशी भविष्य 6 जानेवारी 2024 Today's Horoscope

आजचे राशी भविष्य 6 जानेवारी 2024 Today’s Horoscope

मेष –

धनप्राप्तीचा दिवस असेल. कर्तुत्व अर्थात स्वता:ला सिद्ध कराल. समाजात मानसम्मान प्रतिष्ठा वाढेल. आकस्मित लाभाचा योग आहे. आज शुभ दिनी नवीन योजनेचा प्रारंभ करा. भावंडाच्या तब्येतीची मात्र काळजी घ्या.

- Advertisement -

वृषभ –

अत्यंत शुभ दिवस.समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. कौटुंबिक सौख्य उत्तम रहील. मनात दिवसभर प्रसन्नता असेल. कष्टाचे चीज होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तीना नवीन संधी मिळतील. वक्तृत्वाचा प्रभाव राहील. आत्मसन्मान वाढेल. उत्पन्नात देखील वाढ होईल. नोकरीत अत्यंत महत्वाची जबाबदारी , पद प्राप्त होईल. मात्र कुटुंब स्थानातुन होणारं भ्रमण कुटुंबातील एखादया सदस्याला आरोग्याच्या तक्रारीला सामोरे जावे लागेल.

मिथुन –

आज उत्तम योग जुळून आला आहे. मनशांती आणि प्रचंड उत्साहपूर्ण दिवस असेल. महत्वाची कार्य आज नक्की पूर्ण करा. स्पर्धापरिक्षा, मुलाखतीमध्ये यश मिळेल. बौद्धिक कामातून मान सन्मान वाढेल. गुरु कर्मस्थ, हमखास यश मिळेल. गृहसौख्य उत्तम मिळेल. परदेशी भ्रमणात यश येईल.

कर्क –

आजचा दिवस प्रतिकुल अनिष्ट स्वरूपाचा आहे. प्रचंड मानसिक अस्वस्थता जाणवेल. राग आणि चिडचिडपणावर नियंत्रण ठेवा. वादविवाद होण्याची शक्यता अधिक आहे. आर्थिक हानी अथवा खर्चात वाढ होईल.उत्पन्नापेक्षा खर्च आधिक होईल. कायदेशीर प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता. एकदंरीत हानीकारक, प्रतिकुल दिवस. मानसिक त्रासाच्या तक्रारी उद्भभवतील. अनिद्रेचा त्रास होईल.

सिंह –

लाभदायक दिनमान राहील. जुनी येणी वसुल होतील. व्यापारी वर्गकरीता महत्वाचा योग.आज उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. नोकरदार बढती ,प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरगुती सुविधेत वाढ होईल. वरिष्ठाची मदत मिळेल.आजचा दिवस शुभ आहे.

कन्या –

आज मान प्रतिष्ठा उंचविणारा दिवस आहे. बुद्धीचातुर्य, हजरजबाबीपणा, मुत्सद्दीपणा कामी येईल. धरसोड मनोवृत्ती सोडा. ध्येय निश्चित करा. कर्मस्थानी पौर्णिमेचं चंद्रभ्रमण यशस्वी बनवेल.कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नव-नवीन कल्पना अमलात आणा. क्रिएटिव मंडळीसाठी आजचा दिवस स्पेशल आहे. चंद्रबल उत्तम लाभलेले आहे. संधीचं सोनं करा. विचलीत होऊ नका.

तुला –

भाग्याची उत्तम साथ लाभेल. आध्यात्मिक, धार्मिक कार्य हातून घडेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तीकरिता आज शुभ योग आहे. शासकीय योजना आणल्या जातील. रखडलेले प्रकल्प पुर्णत्वास जातील. धर्माप्रती आस्था वाढेल. नोकरी/व्यवसायात भाग्याची उत्तम साथ लाभेल. शेअर बाजार मधील कामासाठी शुभ दिवस आहे. आपल्या हातून शुभ कार्य घडतील स्त्रीकडून विशेष लाभ होईल.

वृश्चिक –

अत्यंत प्रतिकुल दिवस.अपघात, घातपातचं भय रहिल. आजार उदभवून शस्त्रक्रियासारखी घटना संभवते. दुर्घटना, गंभीर दुखापतीची शक्यता आहे. आजचा दिवस कष्टदायक स्वरूपाचा आहे. घरात वादविवादाचे प्रसंग शक्यतो टाळावेत. मन आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. दु:खद घटना ऐकायला मिळतील. अनिद्रेचा त्रास उद्भवू शकतो. आज अत्यंत सावधानीपूर्वक वाटचाल ठेवावी. निराशाजनक परिणाम येण्याची शक्यता आहे.

धनु –

आजचा दिवस अनुकूल असुन गृहसौख्यात उत्तम संयोग राहील. प्रसन्नतापूर्ण आणि आंनदी मन रहील. आध्यात्माकडे ओढ वाढेल. चतुर्थातुन स्वराशीच्या गुरुचे भ्रमण अत्यंत सुखद बातमी ऐकायला मिळेल.वाहन, स्थावर, जंगम मालमत्ता यात वृद्धी होईल. व्यापारी वर्गासाठी धन वृद्धिचा दिवस आहे. सरकारी कामकाजात यश येईल. गृहसौख्य उत्तम लाभेल. कुटुंबाविषयी स्नेह वाढेल. उत्तम दिनमान आहे.

मकर –

चंद्राचे शत्रुस्थानातून भ्रमण होत असताना गुप्त शत्रुपासुन त्रास होईल. कामाच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. साडेसातीच्या प्रभावामुळं केलेल्या प्रयत्नाला सफलता मिळेल अशी शक्यता आजच्या दिनी कमी आहे. अचानक मोठे संकट अथवा आर्थिक हानीचा सामना करावा लागेल. आरोग्याबाबतीत खर्च वाढेल.

कुंभ –

शुभ दिवस आहे. स्नेह वाढेल.विद्यार्थ्यांची, विद्याभ्यासात रुची वाढेल. घरामध्ये पाहुण्यांचं आगमन होईल. शुभ बातमी ऐकायला मिळेल. प्रकाशन ,लेखक, संपादन, वर्गाकरिता अत्यंत शुभ दिवस आहे. महत्वाची कामे आज नक्की करा. यशप्राप्ती लाभेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या. उत्पनात घट होण्याची शक्यता. हाडाचे विकार, गुडघेदुखीचा त्रास उद्भवतील. बैचेन राहाल. स्वता:वर नियंत्रण ठेवा.

मीन –

अत्यंत प्रतिकूल दिवस. मनात निराशा आणि असंतोषाची भावना राहील.कुटुंबात कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. मातेच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष दयावे. मानसिक उद्रेक, उत्तेजना वाढेल. कष्टदायक दिवस असल्याने आपल्या स्वभावान चंचलता, चिडचिडपणा निर्माण होईल. आज आपण मनावर नियंत्रण ठेवून संयम राखावा.आरोग्याबाबतीत विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या