Monday, June 1, 2026
HomeनगरKarjat : राशीनमध्ये अनधिकृत होर्डिंगचा बळी

Karjat : राशीनमध्ये अनधिकृत होर्डिंगचा बळी

24 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील राशीन (Rashin) येथे अनधिकृत होर्डिंगमुळे (Unauthorized Hoarding) एका 24 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी (31 मे) रात्री झालेल्या जोरदार वादळी वार्‍यासह पावसादरम्यान लोखंडी होर्डिंग कोसळून अमित मोहन सुकाळे (वय 24, रा. राशीन) याचा जागीच मृत्यू (Death) झाला. या प्रकरणी विकास लहू सायकर याच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात (Karjat Police Station) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

रविवारी रात्री कर्जत तालुक्यात जोरदार वादळी वार्‍यासह (Stormy Winds) पाऊस झाला. राशीन येथील महात्मा फुले चौक परिसरात उभारण्यात आलेल्या मोठ्या लोखंडी होर्डिंगवर चोंडी येथील कार्यक्रमाचे बॅनर लावण्यात आले होते. बॅनरला छिद्रे पाडल्यास वार्‍याचा दाब कमी होईल आणि बॅनर फाटणार नाही, असे सांगण्यात आल्याने अमित सुकाळे हा होर्डिंगवर चढला. मात्र त्याचवेळी वार्‍याचा वेग प्रचंड वाढला आणि संपूर्ण लोखंडी होर्डिंग कोसळले. होर्डिंगसह खाली पडलेल्या अमितचा जागीच मृत्यू (Death) झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर राशीन परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनधिकृत होर्डिंगमुळे आणखी किती निष्पाप नागरिकांचे जीव जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी मृताच्या नातेवाईक राजू दौलत मोरे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत विकास लहू सायकर याला अमितच्या मृत्यूस जबाबदार धरण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे.

दरम्यान, या होर्डिंगसाठी संबंधितांची अधिकृत परवानगी होती का, याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांनी दिली. चौकशीदरम्यान आणखी काही व्यक्तींची जबाबदारी आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला सर्वाधिक 250 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 798 कॅरेटची आवक झाली. डाळिंब...