Thursday, May 30, 2024
Homeमुख्य बातम्याRashmi Shukla : रश्मी शुक्लांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती? मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या...

Rashmi Shukla : रश्मी शुक्लांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती? मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

मुंबई | Mumbai

फोन टॅपिंग प्रकरणात (Case of Phone Tapping) वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS officer Rashmi Shukla) यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी एक्सद्वारे (ट्विट) दिली होती. मात्र, काही वेळातच त्यांनी हे ट्विट तात्काळ डिलीट केल्याने चर्चांना उधाण आले आहे…

- Advertisement -

NCP Crisis : राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाची शरद पवार, अजित पवार गटाला नोटीस; उद्या सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश

मंत्री सुधीर मुनगंटीवार एक्सवर (ट्विट) पोस्ट करत म्हटले होते की, “महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी (State Director General of Police) श्रीमती रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.!!” असे लिहिले होते. परंतु, काही वेळाने त्यांनी आपली पोस्ट डिलिट केली. सध्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ (Rajnish Seth) यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे.

रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याचे बोलले जात आहे. शुक्ला यांनी पुण्याचे (Pune) पोलिस आयुक्त, डीआयजी (प्रशासन), नागपूरच्या एसपी आणि सोलापूरचे डीसीपी अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), म्हणून काम पाहिले आहे. मात्र, त्यांचा राज्य गुप्तचर विभागाच्या (SID) आयुक्तपदाचा कार्यकाळ चांगलाच वादग्रस्त ठरला होता. या सर्व आरोपांतून त्यांना दिलासा मिळाल्यानंतर आता त्यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

Sharad Pawar : “भाजपकडे बहुमत होते तर…”; देवेंद्र फडणवीसांच्या राष्ट्रपती राजवटीवरील गौप्यस्फोटाबाबत शरद पवारांचे प्रत्युत्तर

दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश अद्याप काढण्यात आलेला नाही. शुक्ला या सध्या सीआरपीएफमध्ये (CRPF) वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्या राज्यात पुन्हा कमबॅक करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच रश्मी शुक्लांच्या नियुक्तीचा अधिकृत आदेश आज दिवसभरात काढण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच याबाबत माहिती दिली असल्याने जवळपास त्यांचे नाव निश्चित असल्याचे समजते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Sikkim Cloud Burst : सिक्कीमच्या महाप्रलयात ८ जवानांसह २२ जणांचा मृत्यू; तीन हजार पर्यटक अडकले

- Advertisment -

ताज्या बातम्या