Saturday, July 27, 2024
HomeनाशिकMaratha Andolan : जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ धुळगावला रास्ता रोको

Maratha Andolan : जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ धुळगावला रास्ता रोको

येवला | Yeola

जालना जिल्ह्यातील (Jalna district) अंतरवाली सराटी गावामध्ये संविधानिक मार्गाने उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवर (Maratha Agitators) अमानुषपणे लाठीचार्ज करणाऱ्या प्रशासन व राज्यशासनाचा राज्यभर सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे. त्यानुसार आज जिल्हा बंदच्या हाकेमध्ये येवला तालुक्यातील (Yeola Taluka) धुळगाव येथे गावबंद करून समाज बांधवांकडून येवला-लासलगाव रस्त्यावर रास्ता-रोको (Rasta Roko) करण्यात आला…

- Advertisement -

Nashik News : गजरा उद्योग समूहाचे संचालक हेमंत पारख यांचे अपहरण

यावेळी गावातील सर्व व्यवसायधारक, महत्त्वाच्या संस्था, कार्यालये यांनी कडकडीत बंद (Ban) करून घटनेचा निषेध नोंदवला. तसेच ‘एक मराठा लाख मराठा’ व लाठीचार्ज करणाऱ्या प्रशासन व राज्यसरकारचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. जवळपास अर्धा तास येवला-लासलगाव (Yeola-Lasalgaon Road) रस्ता आंदोलकांनी रोखून धरत घटनेचा तीव्र निषेध केला. तसेच उपस्थित समाज बांधवांना मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग शेळके ,योगेश सोमवंशी सरपंच राजेंद्र गायकवाड, सिताराम गायकवाड यांनी निषेध नोंदवत भाषणे केली.

Sinnar Crime News : भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीचा पर्दाफाश; लाखोंचा साठा हस्तगत

दरम्यान, याप्रसंगी माजी चेअरमन दत्तात्रय गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, रामेश्वर गायकवाड, विक्रम गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल वाळके, वसंतराव गायकवाड, सोमनाथ गायकवाड, निलेश गायकवाड, राजेंद्र सोनवणे,संतोष गायकवाड, सागर महाले, वाल्मीक शेळके, गणेश गायकवाड, राजू माळी, पांडुरंग गायकवाड, उत्तमराव गायकवाड, दत्तू गायकवाड, नवनाथ बाराहते, यांच्यासह आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik Road News : बनावट गुटखा बनविणारा कारखाना उद्ध्वस्त

- Advertisment -

ताज्या बातम्या