Sunday, September 8, 2024
Homeनाशिकमहामार्ग दुरुस्तीसाठी रास्ता रोको

महामार्ग दुरुस्तीसाठी रास्ता रोको

येवला । प्रतिनिधी Yevla

पुणे-इंदोर महामार्ग ( Pune-Indore Highway ) हा सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे.या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मनमाडमार्गावर विसापूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन ( Rasta Roko Agitation) करण्यात आले. पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

- Advertisement -

महिन्यापूर्वी काही लाखो रुपये खर्च करून संबंधित ठेकेदाराने बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून थातूर मातुर काम करून, लाखो रुपयांचे बिले काढून घेतले आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने महामार्गावरमोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, बाब अतिशय त्रासदायक आहे.

ठेकेदाराचे लायसन्स तत्काळ रद्द करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, बांधकाम विभाग अधिकार्‍याला तत्काळ निलंबित करा, अशी मागणी पगारे यांनी रास्ता रोकोदरम्यान बोलताना केली आहे.

यावेळी महेंद्र पगारे, विजय घोडेराव, डॉ.सुधीर जाधव, बाळासाहेब अहिरे, विनोद त्रिभुवन, मयूर सोनवणे, विधाता आहिरे , बाळा सोनवणे, हमजाभाई मनसुरी, सुरेश सोनवणे, संतोष आहिरे, आकाश गोतीष, बाळासाहेब गायकवाड, भिमराज गायकवाड , तुषार आहिरे, शरद गायकवाड, आशा आहेर, अ‍ॅड. स्मिता झाल्टे, ज्योती पगारे, उषाताई पगारे, संगीता रणधीर, पार्बताबाई पगारे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या