Sunday, January 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकिसानसभेचे रास्ता रोको आंदोलन

किसानसभेचे रास्ता रोको आंदोलन

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

शेतकर्‍यांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दिंडोरी, पेठ, सुरगाणा व कळवण येथे रास्ता रोको आंदोलन सुरु आहे.

YouTube video player

दिंडोरी
नाशिक – दिंडोरी रस्त्यावरील दिंडोरी चौफुलीवर बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून मोर्चेकर्‍यांनी रॅली काढून दिंडोरी येथील मुख्य चौकात धडकून तेथेच रास्ता रोको आंदोलनास सुरूवात झाली. आंदोलनात शेतकर्‍यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी किसान सभा जिल्हा सेक्रेटरी रमेश चौधरी, मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी देविदास वाघ, डीवायएफआयचे जिल्हा सचिव आप्पा वटाणे यांच्यासह किसान सभा समिती, पक्षाचे तालुका समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तीन तास रास्ता रोको सुरु राहिल्याने रस्त्याच्या चारही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी रुग्णवाहिकेला आंदोलनकर्त्यांनी जागा मोकळी करुन दिली होती. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

बोरगाव
सुरगाणा तालुयातील बोरगाव येथील वणी-बोरगाव-सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील बिरसा मुंडा चौकात बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सर्व तालुयांच्या तहसील कार्यालयांसमोर होणार्‍या या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे माजी राज्याध्यक्ष तथा शेतकरी नेते, माजी आमदार जे. पी. गावीत करीत असून शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास व शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास तत्काळ आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कुंवर, उपनिरीक्षक खाडे व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

पेठ
पेठ तालुका किसान सभेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यासाठी नाशिक – पेठ राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
येथील महादेव मंदिरापासून मोर्चेकर्‍यांची रॅली निघुन राष्ट्रीय महामार्गावरील बायपास वर धडकून तेथेच रास्ता रोको आंदोलनास सुरूवात झाली. किसान सभेचे तालुकाध्यक्ष देवराम गायकवाड, सचिव रामभाऊ गहले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात किसान सभा, डीवायएफआय, महिला जनहिवादी संघटना सहभागी झाले होते. दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीन चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारी एक वाजेपासून सुरू झालेला रास्ता रोको आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरु होता.

या आहेत विविध मागण्या
पश्चिम वाहिनी नद्यांच्या उपनद्यांवर जे.पी. सिमेंट काँक्रिटसारखे आदर्श बंधारे बांधून स्थानिक शेतकरी तसेच खान्देश व मराठवाड्यातील शेतकरी, उद्योगधंदे व औद्योगिक वसाहतींना पाणी उपलब्ध करून द्यावे, अपूर्ण व गाळाने भरलेले बंधारे त्वरित पूर्ण करावेत, वनाधिकार कायदा २००६ अंतर्गत आदिवासींच्या ताब्यात असलेली दहा एकर हक्काची जमीन तात्काळ लाभधारकांना द्यावी, स्वतंत्र सातबारा तयार करून पती-पत्नीचे नाव कब्जेदार सदरी नोंदवावे, इतर हक्क सदरी वनविभाग अथवा महाराष्ट्र शासनाचे नाव असावे, वनपट्टा धारकांना मिळालेल्या जमिनीत विहीर, जमीन सपाटीकरण, फळबाग लागवड, सोलर व मोटर यांसह केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ द्यावा, तसेच उर्वरित प्रलंबित फॉरेस्ट प्लॉट प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, यासह शेतकर्‍यांच्या सर्व पिकांना हमीभाव द्यावा, दोन हेटरपर्यंतच्या भात पिकासाठी आदिवासी विकास विभाग जसा चाळीस हजार रुपयांचा बोनस देतो, त्याचप्रमाणे वनपट्टा धारकांनाही बोनस द्यावा, पेसा क्षेत्रातील सर्व खात्यांमधील नोकरभरती त्वरित पूर्ण करावी, शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांतील कर्मचारी भरती करावी, जिल्हा परिषद शिक्षक भरती पूर्ण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, तसेच शेतकर्‍यांना चोवीस तास वीजपुरवठा करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर

0
मुंबई | वृत्तसंस्था महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील...