Sunday, September 8, 2024
Homeमुख्य बातम्याRatan Tata : उद्योगपती रतन टाटा यांना 'उद्योगरत्न' पुरस्कार प्रदान; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी...

Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी निवासस्थानी जाऊन केला गौरव

मुंबई | Mumbai

प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांचा आज महाराष्ट्राचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार (Udyogratna Award) सन्मानपूर्वक प्रदान करून गौरव करण्यात आला. रतन टाटा यांच्या कुलाबा (Kulaba) येथील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी हा पुरस्कार दिला…

- Advertisement -

Nashik News : तलाठी परीक्षा गैरप्रकार प्रकरण; संशयित निघाला मास्टरमाईंड, चौकशीसाठी पथक रवाना

उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी टाटा यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शाल पुष्पगुच्छ, उद्योगरत्न पुरस्काराचे सन्मानचिन्ह, २५ लाख रुपयांचा धनादेश (Check) आणि खास तयार करण्यात आलेले रतन टाटा यांचे पोट्रेट त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

Maharashtra Politics : “सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात मुख्य खुर्ची बदलणार”; कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा

उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी विधान परिषदेत या पुरस्कारची घोषणा केली होती. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या (Maharashtra Bhushan Award) धर्तीवर या वर्षापासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार हा पुरस्कार देण्यात आला. यंदापासून या पुरस्काराची सुरुवात झाली असून हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार आहे. महिला उद्योजिका, मराठी उद्योजक आणि अन्य एकाला असे तीन पुरस्कार देखील देण्यात येणार आहेत.

Trimbakeshwar News : पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी घेतला त्र्यंबकेश्वर येथील श्रावणमासाच्या नियोजनाचा आढावा

दरम्यान, रतन टाटा यांना यावर्षीच्या एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले होते. यासोबतच टाटा यांना इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच आजचा ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान करतांना उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे हे देखील उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने फडणवीस अस्वस्थ; ठाकरे गटाकडून घणाघात

पुरस्काराचे स्वरुप

‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप २५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप १५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

सुंभ जळाला तरी पिळ कायम; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

- Advertisment -

ताज्या बातम्या