राहाता |प्रतिनिधी| Rahata
ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनाने सामाजिक दातृत्व जपणारं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. उद्योग क्षेत्रामध्ये भारताचे नाव संपूर्ण विश्वात पोहोचविणारे एक अनमोल रत्न म्हणून त्यांची ओळख होती. कोविड संकटात (Covid Crisis) देशाला 500 कोटी रुपयांची त्यांनी केलेली मदत ही स्मरणात राहणारी आठवण असल्याची भावना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केली.
आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले, उगद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी उद्योग क्षेत्रामध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करताना काही आदर्शही सर्वांच्या समोर ठेवले होते. देशाच्या औद्योगिक प्रगतीमध्ये टाटा परिवाराचे योगदान खुप महत्वपूर्ण राहीले. या उद्योग समुहाला पुढे घेवून जाताना एक मार्गदर्शक म्हणून रतन टाटा यांनी बजावलेली भूमिका ही पालकत्वाची राहिली. माणूस कितीही मोठा झाला तरी, सामाजिक जाणिवा विसरायच्या नसतात हा संदेश त्यांनी आपल्या उत्की आणि कृतीतून दिला, असे ना.विखे पाटील यांनी म्हटले आहे.