Friday, April 25, 2025
Homeदेश विदेशLPG Cylinder Price : आजपासून गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे...

LPG Cylinder Price : आजपासून गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर

दिल्ली । Delhi

जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्व सामान्य नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. LPG सिलेंडरच्या किमतीत आज बदल करण्यात आले आहेत. एलपीजी सिलिंडरचे दर ३० रुपयांनी कमी झाले असून आजपासून (०१ जुलै) लागू करण्यात आले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, एलपीजी दरातील ही कपात किरकोळ असून ती १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी आहे. या कपातीमुळे व्यावसायिक एलपीजी वापरकर्ते म्हणजेच, रेस्टॉरंट मालक आणि ढाबा मालकांना स्वस्त सिलिंडर मिळतील. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

एलपीजी सिलिंडरचे दर ३० रुपयांनी कमी झाल्यानंतर दिल्लीत १९ किलोचा गॅस सिलिंडर १,६४६ रुपयांना मिळणार आहे. आधी तोच गॅस सिलिंडर १,६७६ रुपयांना मिळत होता.

तसेच मुंबईत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १,६२९ रुपये होती. आता १,५९८ रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये १,७५६ रुपयांना आता गॅस सिलिंडर मिळणार आहे. आधी त्याची किंमत १७८७ रुपये होती. तसेच चेन्नईमध्ये १,८०९ रुपयांना सिलिंडर मिळणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राज्यात एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai राज्यातील विविध महानगरात वेगवेगळ्या परिवहन सेवा कार्यरत आहेत. या सर्व सेवा एकाच छताखाली आणल्या जाणार असून त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण...