Tuesday, March 25, 2025
Homeनगरकाळ्याबाजारात जाणारे रेशनचे धान्य पकडले

काळ्याबाजारात जाणारे रेशनचे धान्य पकडले

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

गरिबांच्या हक्काचे रेशनचे धान्य (Ration Grains) काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती जामखेडचे तहसीलदार गणेश माळी (Jamkhed Tehsildar Ganesh Mali) यांना मिळाली. त्यानंतर तहसीलदार माळी यांनी जांबवाडी रोडवर स्मशानभूमीजवळ पिकअप पकडली. यात 55 हजार 900 रुपयांच्या 43 धान्याच्या गोण्या व एक पांढर्‍या रंगाची पिकप असा दोन लाख 55 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. याप्रकरणी पिकअप चालकासह चौघांविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात (Jamkhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

रमेश पोपट बांगर (रा. मोहा), विष्णु टकले, आशोक टकले (पुर्ण नाव माहीत नाही) दोघे रा. बटेवाडी व वाहनचालक लखन सतिश क्षीरसागर (रा. साकत फाटा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 24 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास वाहन लखन सतिश क्षिरसागर हा पांढर्‍या रंगाचे पिकअप क्रमांक एम. एच. 12 एमव्ही 7243 मधून रेशनचे धान्य (Ration Grains) काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन चालला होता. ही माहिती तहसीलदार माळी यांना समजली. त्यांनी तातडीने पथकासह या वाहनाचा पाठलाग केला. हे वाहन नगररोडकडून शासकीय विश्रामगृहाच्या समोरून विंचरणा नदीच्या जुन्या पुलावरून जांबवाडी रोडकडे जात असतांना तहसीलदार माळी यांनी ते थांबवून त्याची तपासणी केली.

यावेळी त्यांना पिकअपमध्ये तांदुळाचे 43 कट्टे मिळून आले. या गोण्यावर गव्हमेंन्ट ऑफ पंजाब असे नाव होते. यानंतर सदरचे वाहन व धान्य पकडुन जामखेड पोलिस ठाण्यात (Jamkhed Police Station) आणण्यात आले. या प्रकरणी शासकीय धान्य गोदामाचे गोदामपाल बाळु भोगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिस करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...