धुळे । dhule । प्रतिनिधी
शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील जयशंकर कॉलनीत (Jaishankar Colony) पोलिसांनी छापा (Police raid) टाकत तांदळाचा ट्रक (Caught a rice truck) पकडला. हा तांदुळ रेशनचा (ration)असल्याचा संशय असल्याने ट्रकसह सुमारे 25 टन तांदुळ 20 ते 25 लाखांचा मुद्देमाल जप्त (Confiscation of goods) करण्यात आला. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.
धुळ्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
जयशंकर कॉलनीतून एमएच 18 बीए 1457 क्रमांकाच्या ट्रकमधून रेशनच्या तांदुळाची तस्करी होत असल्याची गोपनिय माहिती चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकत संशीयत ट्रकला पकडले. त्याची तपासणी केली असता सुमारे 25 टन तांदुळ होता.
Accident# भरधाव डंपरने विद्यार्थिनीला चिरडले
तो रेशनचा असल्याचा संशय असून पोलिसांनी ट्रकसह तांदुळ जप्त केला. याबाबत पुरवठा विभागाला कळविण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार यांनी केली.
Good news : जगाची लोकसंख्या 800 कोटींवर!
ही कारवाई पोलिस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक एस ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, पोसई विनोद पवार, पोकाँ झोळेकर, पोकॉ वैराट, चालक गायकवाड यांनी केली आहे.
दूध संघाच्या 70 एकर जमिनीवर भाजपा नेत्यांचा डोळा