Wednesday, May 22, 2024
Homeजळगावरावेर : जनता कर्फ्यू रद्द करण्याची नामुष्की

रावेर : जनता कर्फ्यू रद्द करण्याची नामुष्की

रावेर – Raver

शहरात जनता कर्फ्यू पाळण्यासाठी पालिकेच्या नगरसेवकांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली असता,दि.१३ जुलै ते १९ जुलै दरम्यान कर्फ्यू पाळण्याची परवानगी देण्यात आली होती,मात्र शहरातील विविध पक्षांच्या पदाधिकारी यांनी हा जनता कर्फ्यू पाळू नये,आधीच नागरिक लॉकडाऊन मुळे होरपळले आहे.

- Advertisement -

हाताना काम नाही,बेरोजगारी आणि उपासमारिचा सामना करत आहे,आताच कुठे लोक कामाच्या शोधात आहे,अशा कठीण काळात जनता कर्फ्यू लादून लोकांवर वाईट प्रसंग आणू नये अशी भूमिका घेतली गेल्याने शहरातील जनता कर्फ्यू रद्द झाला आहे.याबाबत मुख्याधिकारी यांनी देखील दुजोरा दिला आहे.

रावेरात मोठ्या प्रमाणात कोरोना पोझीटिव्ह येत असल्याने साखळी तोडण्यासाठी पालिकेच्या नगरसेवकांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देऊन जनता कर्फ्यू लावण्याची विनंती केली होती,त्यानुसारच दि.१३ जुलै ते १९ दरम्यान हा कर्फ्यू पाळण्यात येणार होता.

मात्र आज रविवारी सायंकाळी विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन जनता कर्फ्यू लादून नागरिकांच्या अडचणी वाढतील.यासाठी कर्फ्यू न लावता उपाय योजना आखून त्यावर भर दिली तर नागरिकांवर उपासमारीची वेळ येणार नाही अशी भूमिका मांडून जनता कर्फ्यू पाळणार नाही असे निवेदन दिल्याने सोमवार पासून ७ दिवस पाळला जाणारा जनता कर्फ्यू रद्द झाला आहे.

जिल्ह्यात जळगाव,भुसावळ,अमळनेर या ठिकाणी मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ७ दिवस कळकळीत बंद पाळण्यात आला,रावेरात तसा आदेश नसल्याने केवळ लोकांनी उत्स्फुर्दपणे सहभागी होवून जनता कर्फ्यू पाळण्याची माहिती होती.मात्र याबाबत दोन भिन्न भिन्न मते असल्याने जनता कर्फ्यू रद्द झाला आहे.उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत आदेश जारी झाले तर कदाचित कर्फ्यू लागण्याची शक्यता आहे

रवींद्र लांडे,मुख्याधिकारी रावेर

- Advertisment -

ताज्या बातम्या