रावेर | प्रतिनिधी raver
शुक्रवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पाऊस असल्याने अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली होती. महसूल प्रशासनाने घेतलेल्या पर्जन्यमान नोंदीत सर्वाधिक पाऊस खिरोदा प्र.यावल मंडळात झाला आहे. तर खानापूर मंडळात कमी पाऊस पडला आहे.
- Advertisement -
तालुक्यात १६७ मिमी पाऊस पडला आहे.यात रावेर मंडळात २६ मिलीमीटर, खानापूर-२०, ऐनपूर-२५, खिर्डी-२१. निंभोरा बु-२४,सावदा-२३, खिरोदा प्र.यावल २८ मि.मी.पाऊस पडला आहे. शुक्रवारी रात्रीपासून पाऊस व वारा असल्याने अनेक भागात केळीचे नुकसान झाले आहे. संततधार असल्याने जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.