Monday, May 27, 2024
Homeजळगावरावेरच्या विधी पाटीलने पटकवला सर्वोत्कृष्ठ गायिकेचा बहुमान

रावेरच्या विधी पाटीलने पटकवला सर्वोत्कृष्ठ गायिकेचा बहुमान

रावेर | प्रतिनिधी raver

बुर्‍हाणपूर येथील कला साहित्य सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित (Talent Hunt Competition) टॅलेंट हंट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गायिकेचा बहुमान रावेर येथील विधी प्रविण पाटील हिने पटकावला आहे. ३६ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात विधी हिचा परफॉर्म सर्वोकृष्ठ असल्याने तिने पहिला क्रमांक जिंकला आहे.

- Advertisement -

बऱ्हाणपूर (Barhanpur) येथील हॉटेल उत्सवमध्ये अंतिम स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.यात ३६ स्पर्धक सहभागी होते. ज्युनियर गटात सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून कु.विधी पाटील,तर नृत्य स्पर्धेत हितांशी अग्रवाल यांचा प्रथम क्रमांक आला आहे.

वरिष्ठ गटात गायक नंदलाल सनांसे,नृत्य स्पर्धेत ज्ञाती मार्चे तर गायक मोहम्मद रफीक सुपर सिनियर गटात नृत्य यात दिलप्रीत चीमा सर्वोत्कृष्ट ठरला आहे.बुर्‍हाणपूर येथे इयत्ता ५ वी. मध्ये शिक्षण घेणारी विधी प्रविण पाटील हि रावेर शहरातील फोटोग्राफर तथा पत्रकार प्रवीण पाटील यांची मुलगी आहे.

या कार्यक्रमाला खा.ज्ञानेश्वर पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष मनोज लधवे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अजय रघुवंशी, संस्थापक अध्यक्ष नीलेश महाजन, आनंद चौकसे, उमेश जंगले, संदेश माहेश्वरी, अर्चना गोविंदजीवाला, राजेश सावकारे, विकास ठाकूर, सुधाकर महाजन उपस्थित होते.

गायन स्पर्धेत परीक्षण डॉ.सतीश वर्मा,प्राचार्य रागिणी विनयकुमार जोशी खरगोणे, नामदेव भोयटे, भारती मालवीय (मुंबई), रवी फुलमाळी, विजय महाजन, कला साहित्य व सांस्कृतिक मंचाचे संरक्षक ठाकूर वीरेंद्र सिंग, चित्रकार राज भावसार, उपाध्यक्ष जिकेश माग्रे, सुनंदा वानखेडे, सचिव ऋषी मुलतकर, सहसचिव प्रिया हसनंदानी, खजिनदार कमलेश पांजराई, अश्विन मुलाटकर, डॉ.कुणाल मालवीय उपस्थित होते.सूत्रसंचलन दिलीप मोरे आभार जिकेश मगरे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या