दिल्ली | Delhi
देशाची गुप्तचर संस्था रॉ प्रमुख पदासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. आता देशाची गुप्तचर संस्था रॉ प्रमुख म्हणून रवी सिन्हा यांच्या नियुक्तीला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे, छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा नवे रॉ प्रमुख असतील. रवी सिन्हा हे सामंत कुमार गोयल यांची जागा घेतील. सामंत कुमार गोयल यांचा रॉ प्रमुखपदाचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे.
- Advertisement -