Thursday, May 15, 2025
Homeमुख्य बातम्याकसबा गणपतीसमोर रविंद्र धंगेकरांचे भाजप विरोधात उपोषण; कारण काय?

कसबा गणपतीसमोर रविंद्र धंगेकरांचे भाजप विरोधात उपोषण; कारण काय?

पुणे | Pune

- Advertisement -

पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा काल शेवटचा दिवस होता. गेल्या १५ दिवसांपासून सुरू असेलली राजकीय रणधुमाळीमुळे पुण्यातील वातावरण ढवळून निघाले होते.

प्रचारादरम्यान भाजपाने पोलिसांसोबत मिळून कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. या विरोधात आज ते सकाळी १० वाजता कसबा गणपती मंदीरासमोर सपत्नीक उपोषणाला बसले आहेत.

उमेवारी अर्ज भरल्यापासून आम्ही निवडणूक आयोगाचे नियम पाळत आहोत. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत पैशांचा पाऊस पाडला आहे. स्वत: गिरीश महाजन हे मतदार संघात गुन्हेगारांना घेऊन फिरत होते. असे असतांना पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे असतांना माझ्याच कार्यकर्त्यांना दमदाटी केली जात होती. या बाबत आम्ही पोलिसांना निवेदन देऊनही कारवाई झाली. भाजपने लोकशाहीचा गळा घोटला असून त्यामुळे संविधान टिकवण्यातही हे उपोषण सुरू केले असल्याची प्रतिक्रिया रवींद्र धंगेगर यांनी दिली.

प्रचार संपल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सात वाजले तरी मतदार संघात कार्यरत होते. हा कुठला न्याय आहे ? मी कुणाला घाबरत नाही. भाजपवले आता घाबरले आहे. जर पोलिस संरक्षणात जर पैसे वाटल्या जात असतील आणि निवडणूक आयोग जर त्या कडे डोळेझाक करत असतील तर आम्ही न्याय कुणाला मागायचा. त्यामुळे न्याय देणारी ही जनता आहे, या जनेतेच्या दरबारात मी बसलो आहे असे देखील धंगेकर यावेळी म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...