मुंबई | Mumbai
काँग्रेसचे नेते रविद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे दिली.
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे काँगेस सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. धंगेकर यांनी काही वेळापूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की त्यांनी काँग्रेसला आता रामराम केला आहे.
रवींद्र विद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे दिली. त्यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, “चंत्रकांत पाटील साहेब आता इथून पुढे विचारू नका Who Is Dhangekar? कारण आता ते तुमचे सखे सोयरे झालेत बरं का”, अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. विधानसभा निवडणुकीनंतर धंगेकर यांनी ठाण्यात येऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर धंगेकर काँग्रेसला सोडून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
तसेच काही दिवसांपूर्वी धंगेकर यांनी गळ्यात भगवा गमछा घातलेला फोटो आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला होता. यानंतर त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजलं जात होतं. मात्र रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही, मी आता काँग्रेस पक्ष संघटनेत सक्रीय होणार, असं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी दिलं होतं. पण आता अखेर रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याचं निश्चित झाल्याचं म्हटलं जातंय.