Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रAccident News : शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या गाडीला अपघात; मद्यधुंद टेम्पोचालकाची कारला...

Accident News : शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या गाडीला अपघात; मद्यधुंद टेम्पोचालकाची कारला धडक

मुंबई । Mumbai

मुंबईत अपघाताचे सत्र सुरुच असल्याचे दिसत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यामध्ये एकाच मृत्यू झाला होता. त्यानंतर आता शिवेसना खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला रविवारी मध्यरात्री अपघात झाला. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. आयशर टेम्पो आणि वायकरांच्या गाडीची धडक झाली. यावेळी खासदार वायकरही गाडीतच होते. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक चौकशी केली जात आहे.

या अपघाताबद्दल मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार खासदार रवींद्र वायकर यांच्या कारच्या अपघातात टेम्पोची वायकरांच्या गाडीला धडक दिली असून चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जोगेश्वरीचा सीआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या या दुर्घटनेत पोलीस चौकशी सुरू आहे.

दरम्यान, रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा खासदार आहेत. उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे वायकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा परभव केला होता. या निवडणुकीत रवींद्र वायकर यांचा ४८ मतांनी विजय झाला. या विजयावर आक्षेप घेत अमोल कीर्तिकर यांनी कोर्टात धाव घेत खासदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...