मुंबई । Mumbai
मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) ग्राहक सेवा विभागाला धमकीचा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला ‘लश्कर – ए – तैयब’चा विशेष कार्यकारी अधिकारी असल्याचा दावा केला. हा कॉल शनिवार सकाळी सुमारे १० च्या आला होता.
फोनवरील व्यक्तीनं तो लष्कर-ए-तोयबाचा सीईओ असल्याचं सांगत मागचा रस्ता बंद करा. इलेक्ट्रिक कार खराब झाली आहे, असं म्हणून फोन ठेवला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीनुसार माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा कोणाचा तरी खोडसाळपणा असू शकतो.
दरम्यान याआधी गुरुवारी (१४ नोव्हेंबर) मुंबईतील जेएसए लॉ फर्म बॅलार्ड पेअर आणि जेएसए कार्यालय कमला मिल लोअर पर्ल यांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला होता. या धमकी देणाऱ्या मेल कंपनीच्या ईमेल आयडीवर फरझान अहमद असे नाव लिहिले होते. जेएफए फर्मच्या कार्यालयात आणि बॅलार्ड इस्टेटच्या कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे या मेलमध्ये लिहिले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.