Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाप्ले ऑफ प्रवेशासाठी बंगळूर मुंबई सज्ज

प्ले ऑफ प्रवेशासाठी बंगळूर मुंबई सज्ज

मुंबई | Mumbai

ड्रीम इलेव्हन आयपीएलमध्ये बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे.

- Advertisement -

मुंबई १४ गुणांसह दुसऱ्या तर बंगळूर १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

या सामन्यात विजय संपादन करून बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. त्यामुळे नेमका कोणता संघ बाजी मारतो ? हे सांगणे कठीण आहे.

नियमित कर्णधार रोहित शर्मा हॅमस्ट्रिंग मुळे दुखापतग्रस्स्त आहे. त्यामुळे सामन्यात तो खेळणार का ? यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे पुन्हा पोलार्डकडे मुंबई संघाचे नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता आहे. दुबई येथे झालेल्या मागील लढतीत बंगळूरने मुंबईवर सुपर ओव्हरमध्ये सुपर विजय संपादन केला होता.

त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबई सज्ज झाली आहे. बंगळूर संघासाठी जमेची बाजू म्हणजे विराट कोहली , देवदूत पडिकल , एरन फिंच , अब्राहाम डिव्हिलिअर्स चांगल्या लयीत आहेत.

त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे. गोलंदाजीत क्रिस मॉरिस , युझवेन्द्र चहल , नवदीप सैनी चांगली गोलंदाजी करत आहेत. त्यांना इतर गोलंदाजांची साथ मिळणे गरजेचे आहे .

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या