Friday, November 22, 2024
Homeनाशिकजलसंधारण विभागाच्या ६७० पदांची फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार

जलसंधारण विभागाच्या ६७० पदांची फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार

जलसंधारणमंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेतली जाणार आहे. अमरावतीमधील परीक्षा केंद्रावरील गैरप्रकारानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता १४, १५ आणि १६ जुलै रोजी ही परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती मृद आणि जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे .

- Advertisement -

मृद आणि जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा आढावा बैठक मंत्रालयात आयोजित केली होती. त्यावेळी संजय राठोड, विभागाचे सचिव गणेश पाटील, टीसीएस कंपनीचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० पदे सरळसेवेने भरण्यासाठी १९ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर परीक्षा ही शासनमान्य टीसीएस या कंपनीमार्फत, राज्यातील २८ जिल्ह्यांतील ६६ केंद्रांवर २० आणि २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षेदरम्यान २१ फेब्रुवारी रोजी नांदगाव पेठ, अमरावती शहर येथील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले. परीक्षार्थी यांनी याबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनेचा विचार करून २० वआणि २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेली परीक्षा शासन मान्यतेने रद्द करण्याचा निर्णय १५ मार्च रोजी घेण्यात आलेला होता.

आता १४, १५ आणि १६ जुलै रोजी हाेणारी फेरपरीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या सात शहरांतील एकूण १० टिसीएस-आयओएन या कंपनीच्या अधिकृत केंद्रावरच घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र इत्यादी बाबत सर्व उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार आहे. पूर्ण सुरक्षित तंत्रांज्ञानासह जिल्हाधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ही परीक्षा होणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून आल्यास संबंधितास जबाबदार ठरवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा संजय राठोड यांनी दिला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या