मुंबई | Mumbai
आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारने रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणार्यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात 5.95% (मुंबई वगळता) एवढी वाढ करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागात 3.36% वाढ करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी आज 1 एप्रिलपासून होत असल्याने मालमत्ता आणि घर खरेदी महागणार आहेत.
अहिल्यानगर मनपा क्षेत्रात 5.41% ,प्रभाव क्षेत्रात 3.29%, नगरपरिषद / नगर पंचायत क्षेत्र 4.97%, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र सरासरी वाढ 3.39% अशी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ पाहता राज्यात सरासरी 4.39% (मुंबई वगळता) व राज्याची एकूण रेडीरेकनर दरातील वाढ ही 3.89% करण्यात आली आहे.
रेडीरेकनेर दरात वाढ झाल्यानंतर आपसूकच मुद्रांक शुल्काच्या स्वरूपात राज्य सरकारच्या महसुलात मोठी वाढ होणार आहे. या संपूर्ण मुद्रांक शुल्क वाढीतून राज्य सरकारला वर्षाकाठी 70 ते 75 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची आशा आहे.