Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजReady Reckoner Rate : रेडी रेकनर दरात वाढ; घरे आणि मालमत्ता खरेदी...

Ready Reckoner Rate : रेडी रेकनर दरात वाढ; घरे आणि मालमत्ता खरेदी आणखी महागणार

नाशिकला 'इतके' टक्के रेडी रेकनर दरवाढ

नाशिक | Nashik

गेल्या तीन वर्षापासून रेडी रेकनरच्या दरात (Ready Reckoner Rate) राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, यावेळी राज्यातील सर्वच विभागांत रेडी रेकनरचे दर वाढवण्यात आले आहेत. राज्यातील रेडी रेकनरच्या दरात सरासरी ४.३९ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात घरे आणि मालमत्ता (Houses and Property) खरेदी करणे आणखी महाग होणार आहे.

- Advertisement -

यात राज्याच्या ग्रामीण भागात सरासरी ३.३६ टक्के, प्रभाव क्षेत्रात ३.२९ टक्के, नगरपालिका / नगरपंचायती क्षेत्रात ४.९७ टक्के, तर महानगरपालिका क्षेत्रात ५.९५ टक्के वाढ़ (मुंबई वगळता) करण्यात आली आहे. या नवीन दरांची अंमलबजावणी आजपासून म्हणजेच ०१ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. या वार्षिक मुल्यदर तक्त्यानुसार सन २०२५-२६ वर्षासाठी नाशिकसाठी ७.३१ टक्के वाढीचे रेडी रेकनर दर निश्चित करण्यात आला आहे. प्रत्यक्षात २०१७-१८ साली वार्षिक मूल्यदर तक्ते तयार करणेत आले होते. त्यानंतर सलग दोन वर्षे स्थावर मिळकत क्षेत्रातील मंदीचा विचार करून (सन २०१८-१९ व २०१९-२०) साठी सदर दर कायम ठेवण्यात आले होते.

सन २०२०-२१ साली करोना (Corona) परिस्थितीमुळे शासनाने (दि. १८. ०३.२०२०) पासून लागू केलेले निबंध व कार्यालयातील मर्यादित उपस्थिती यामुळे शासनाने पुढील आदेश होईपर्यंत वार्षिक मुल्यदर तक्ते कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने सदर काम पूर्ण झाल्यानंतर (दि.१२.०९.२०२०) रोजी सन २०२०-२१ करिता वार्षिक मुल्यदर तक्ते प्रसिध्द करण्यात आले असताना करोना परिस्थितीमुळे स्थावर मिळकतीचे बाजारातील मंदीचा विचार करता सदर दरास कमीत कमी वाढ देण्यात आली होती.

तर सन २०२१-२२ चे वार्षिक मूल्यदर तक्त्यास शासनाकडून (Government) स्थगिती देण्यात आल्याने सन २०२०-२१ चे दर सन २०२१-२२ करिता कायम ठेवण्यात आले होते. तसेच सन २०२२-२३ चे वार्षिक मूल्यदर तक्ते प्रसिध्द करण्यात आले असून, यात सन २०२१-२२ चे वार्षिक मूल्यदर तक्त्यंच्या तुलनेत कमी वाढ प्रस्तावित केली होती.सद्यस्थितीत सन २०२२-२३ चे वार्षिक मूल्यदर तक्ते सन २०२३-२४ व २०२४-२५ करिता कायम ठेवण्यात आले होते.

रेडिरेकनरचा दर

पुणे – ४.१६ टक्के

पिंपरी-चिंचवड- ६.६९ टक्के

नवी मुंबई- ६.७५ टक्के

ठाणे- ७.७२ टक्के

कोल्हापूर- ५.०१ टक्के

नाशिक- ७.३१ टक्के

सोलापूर – १०.१७ टक्के

पनवेल – ४.९७ टक्के

सांगली-मिरज-कुपवाड- ५.७० टक्के

उल्हासनगर – ९.०० टक्के

अकोला – ७.३९

लातुर – ४.०१

परभणी – ३.७१

अमरावती – ८.३

नागपूर एन एम आर डी ए – ६.६०

धुळे – ५.७

मालेगाव ४.८८

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...