Saturday, July 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनॉन क्रिमीलेअर मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नॉन क्रिमीलेअर मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

४३ नव्या जातींच्या समावेशासाठी केंद्राकडे जाणार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

नॉन क्रिमीलेअरची मर्यादा आठ लाखावरून १५ लाखांपर्यंत करण्याच्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल, अशी माहिती ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी येथे दिली.

बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती बैठक पार पडली. या बैठकीत नॉन क्रिमीलेअरची मर्यादा वाढवण्याच्या शिफारशीसह केंद्र सरकारच्या इतर मागास प्रवर्गाच्या यादीत समाविष्ट नसलेल्या ४३ जातीचा प्रस्ताव राष्ट्रीय मागासवर्ग आयोगास सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

आजच्या बैठकीत विविध तांत्रिक आणि धोरणात्मक विषयांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जात पडताळणी समितीकडील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणे, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती आणि विविध महामंडळांच्या नियुक्त्यांचा प्रश्न अग्रक्रमाने सोडविणे, राज्य मागासवर्ग आयोगाचे बळकटीकरण, उपसंचालक, सहाय्यक संचालक यांना वाहन घेण्यास मंजुरी, शिबिरांचे आयोजन करुन त्या माध्यमातून जात प्रमाणपत्रांचे वाटप करणे, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य आणि पात्र व्यक्तींनाच प्रमाणपत्र दिले जावे अशी शिफारस करणे तसेच चुकीच्या लोकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येऊ नये असे आदेश देण्यात यावेत, यावर चर्चा करण्यात आली. वसतिगृह आणि कार्यालयांसाठी १० जिल्ह्यांमध्ये जागा उपलब्ध करण्यासाठी पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीसाठी विशेष उपस्थित ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी प्रशासकीय त्रुटींकडे लक्ष वेधले. “स्पेलिंग मिस्टेकमुळे राज्यातील २७ ते ३२ जाती शासकीय लाभांपासून वंचित आहेत. यावर केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. या बैठकीला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वनमंत्री गणेश नाईक, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, इतर मागास बहुजन कल्याण आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने आज टॉर्च मार्च काढण्यात आला.सायंकाळी 6 वाजता कॅनडा कॉर्नर येथून...