Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजइतर मागासवर्गाच्या केंद्रीय यादीत महाराष्ट्रातील काही जाती, समुदायांचा समावेश करण्याची केंद्राला शिफारस

इतर मागासवर्गाच्या केंद्रीय यादीत महाराष्ट्रातील काही जाती, समुदायांचा समावेश करण्याची केंद्राला शिफारस

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (एनसीबीसी) आज केंद्र सरकारकडे या ओबीसी जाती / समुदायांचा समावेश करण्याबाबत शिफारस केली आहे; तसेच (1) लोध, लोधा, लोधी (2) बडगुजर, (3) सूर्यवंशी गुजर, (4) लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर ; (5) डांगरी 6) भोयर, पवार; (7) कपेवार, मुन्नार कपेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंताररेड्डी, बुकेकरी जाती/समुदाय महाराष्ट्र राज्यासाठी इतर मागासवर्गीय (ओबीसी) च्या केंद्रीय यादीत समावेश करण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

याबाबत, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि आयोगाचे सदस्य भुवन भूषण कमल यांचा समावेश असलेल्या आयोगाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने १७ ऑक्टोबर २०२३ आणि २६ जुलै २०२४ रोजी मुंबई येथे यासंदर्भात सुनावणी घेतली होती. मंगळवारी ८ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याच्या ओबीसींच्या केंद्रीय यादीत वरील जातींचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती, केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय विभागाने दिली आहे.

ताज्या बातम्या

२ मे रोजी जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल

0
पुणे । प्रतिनिधी Pune राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी लेखी परीक्षेचा निकाल , शनिवारी 2 मे...