Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशदेशात एका दिवसातील विक्रमी करोना चाचण्या

देशात एका दिवसातील विक्रमी करोना चाचण्या

दिल्ली | Delhi

करोना विरोधातल्या लढ्यात भारताने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. पहिल्यांदाच एका दिवसात सर्वाधिक म्हणजे सुमारे 15 लाख कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 14,92,409 चाचण्या करण्यात आल्या असून एकूण चाचण्यांची संख्या सुमारे 7 कोटी (6,89,28,440) झाली आहे.

- Advertisement -

शेवटच्या एक कोटी चाचण्या केवळ 9 दिवसात करण्यात आल्या आहेत. दहा लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या चाचण्यांची संख्या आज 49,948 होती. चाचण्यांच्या संख्येत वाढ केल्यास त्यानंतर पॉझिटीव्हीटी दर कमी होतो असे आढळून आले आहे. जी राज्ये जास्तीत जास्त चाचण्या करत आहेत तिथे पॉझिटीव्हीटी दर हळूहळू कमी होत आहे. राष्ट्रीय पॉझिटीव्हीटी दर आज 8.44% आहे.

प्रयोगशाळाचे जाळे आज 1818 प्रयोगशाळापर्यंत विस्तारले आहे. यामध्ये 1084 सरकारी क्षेत्रातल्या तर 734 खाजगी प्रयोग शाळांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या