Saturday, April 26, 2025
Homeक्रीडाआयपीएल इतिहासातील रेकार्ड

आयपीएल इतिहासातील रेकार्ड

मुंबई – Mumbai

आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा थरार 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठी काही संघ युएईमध्ये दाखल झाले आहेत. तर काही संघ रवाना होण्यासाठी सज्ज आहेत, आयपीएलच्या या हंगामाची उत्सुकता…

- Advertisement -

भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पसंतीच्या संघांना शुभेच्छा देत आहेत. यावरुन या स्पर्धेची लोकप्रियता लक्षात येते. आयपीएलमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडू सहभागी होऊन ’दम’ दाखवतात. यात अनेक विक्रम प्रस्थापित झाले आहेत. अशाच विक्रमाबद्दल सांगायचे झाले तर हे विक्रम कदाचित पुढेही तुटणार नाहीत.

एका हंगामात सर्वाधिक धावा

आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने 2016 च्या आयपीएल हंगामात खेळताना धावाचा पाऊस पाडला. त्याने या हंगामात 973 धावा झोडपल्या. विशेष बाब म्हणजे, विराटची बॅट तळपून देखील आरसीबीचा संघ स्पर्धेचे विजेतेपद पटकावू शकला नाही.

हॅट्रीकचा असाही विक्रम

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी गोलंदाजामध्ये अमित मिश्राचे नाव टॉपवर आहे. त्याने आयपीएलमध्ये तीन हॅट्रीक घेतल्या आहे. असा कारनामा कोणत्याही अन्य खेळाडूला करता आलेला नाही. अमित मिश्राने 2008, 2011 आणि 2013 या आयपीएलच्या हंगामात खेळताना हॅट्ट्र्ीकची किमया साधली. आयपीएल इतिहासात आतापर्यंत 15 गोलंदाजांनी हॅट्टि्र्क घेतल्या आहेत.

एका डावात सर्वात यशस्वी विक्रमी गोलंदाजी

आयपीएलच्या सामन्यात एका डावात सर्वात श्रेष्ठ गोलंदाजी करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरच्या नावे होता. त्याने राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना 14 धावा देत 6 गडी तंबूत धाडले होते. तन्वीरचा हा विक्रम अल्झरी जोसेफने मोडला. मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना जोसेफने सनरायजर्स हैदराबाद विरोधात 12 धावात 6 गडी टिपले होते. हा विक्रम मोडणे सद्य घडीला कठिण आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांत्वन

0
पुणे । प्रतिनिधी Pune जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...