Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजवणी उपबाजार समितीत उन्हाळ कांद्यास विक्रमी भाव

वणी उपबाजार समितीत उन्हाळ कांद्यास विक्रमी भाव

वणी । वार्ताहर Vani

- Advertisement -

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वणी उपबाजार आवारात उन्हाळ कांद्यास 5151 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

वणी उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याच्या 175 नगाची आवक झाली असून 4200 ते 5151 रुपये प्रती क्विंटल असा बाजार भाव मिळाला. देशांतर्गत बाजार पेठेत तसेच परदेशात देखील नाशिक जिल्ह्यातील कांद्यास मागणी मोठ्या प्रमाणावर असते. देशातील इतर राज्यातील देखील कांद्याचे उत्पादन चांगले असले तरी येथे मिळणार्‍या कांद्यास मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

शेतकरी बांधवांकडे मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांदा अजूनही शिल्लक असल्याने साठवून ठेवलेल्या मालास चांगला भाव मिळत आहे. कांदा ऊत्पादक शेतकर्‍यांनी प्रतवारी करून कांदा बाजारात आणावा असे आवाहन दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड व संचालक मंडळाने केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या