Monday, May 20, 2024
Homeनाशिकआराेग्य क्षेत्रांत नाेकरीची संधी; असा करा अर्ज

आराेग्य क्षेत्रांत नाेकरीची संधी; असा करा अर्ज

नाशिक | Nashik

करोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील काही महिन्यांपासून रुग्णालय व आरोग्य क्षेत्रांत मनुष्यबळाची मागणी वाढली आहे.

- Advertisement -

तर स्थानिक बेरोजगारांना कामाची आवश्यकता भासते आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या पुढाकारातून ५ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ‘ऑनलाइन हेल्थकेअर रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.

करोना संकटातही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने आयोजित केलेल्या ऑनलाइन रोजगार मेळाव्यांना नोकरीच्छुक उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

आरोग्य सेवेत कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी हेल्थकेअर रोजगार मेळावा होणार आहे. महास्वयम वेबपोर्टलवर होणाऱ्या मेळाव्यात मुलाखती मोबाइल दूरध्वनी, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित हॉस्पिटल व हेल्थकेअर सेक्टरमधील नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणाऱ्या किंवा ऑनलाइन अर्ज केलेल्या योग्य उमेदवारांच्या नियोक्त्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाइन मुलाखती घेण्यात येणार आहेत.

या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या