Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रऔरंगाबाद जिल्ह्यात 169 रुग्णांची भर

औरंगाबाद जिल्ह्यात 169 रुग्णांची भर

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 429 जणांना (मनपा 262, ग्रामीण 167) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 28243 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 169 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 34010 झाली आहे. आजपर्यंत एकूण 947 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4820 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 62 आणि ग्रामीण भागात नऊ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्णसंख्या) आहे.

मनपा (55)

एनआरएच हॉस्टेल परिसर (1), जयभवानी नगर (2), कांचनवाडी (1), अविष्कार कॉलनी एन सहा (3), ठाकरे नगर (2),भारतमाता नगर (2), सिंहगड कॉलनी (1), साईनगर एन सहा, सिडको (7), टाऊन सेंटर सिडको (2), पोलीस कॉलनी चिकलठाणा (1), जटवाडा रोड (1), समर्थ नगर (1), सातारा परिसर (1), न्यू विठ्ठल नगर (1), संघर्ष नगर, मुकुंदवाडी (1), देशमुख नगर, गारखेडा (2), भावसिंगपुरा (1), एन एक सिडको (2), मिलिट्री हॉस्पिटल (1), श्रेय नगर (2), महालक्ष्मी कॉलनी, सिडको (1), चिकलठाणा (2), सुराणानगर (1), राजमाता जिजाऊ सोसायटी परिसर, सिडको (1), टीव्ही सेंटर परिसर (1), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), इटखेडा (1), बालाजी नगर (2), जाधववाडी (1), बेगमपुरा (1), घाटी परिसर (1), वृंदावन कॉलनी (1), ग्लोरिया सिटी, भावसिंगपुरा (2), क्रांती चौक परिसर (1), मुकुंदवाडी (2)

ग्रामीण (52)

गुलाज गेवराई (1), सिडको महानगर (1), मंजित प्राइड, सिडको (1) फुले नगर वडगाव कोल्हाटी (1), साई सरोज बजाज नगर (2),देवगिरी नगर सिडको बजाज नगर (1),चिंचबन कॉलनी बजाजनगर (1), जयभवान चौक बजाज नगर (1), साई श्रध्दा पार्क बजाजनगर (1), लांझी (8), साठे नगर (1), पोलीस स्टेशन वाळूज (1), बकवाल नगर वाळूज (1), वाकळा, वैजापूर (2), आनंदपूर (2), रांजणगाव, निलजगाव, पैठण (1), देभेगाव, कन्नड (1), सिटी पोलीस स्टेशन परिसर, कन्नड (1), लाडगाव (1), करमाड (3), पिंप्री राजा (2), पाचोड (1), समता नगर, गंगापूर(1),रघुनाथ पाटील कॉलनी, गंगापूर (1), पोलीस कॉलनी,वैजापूर(1), भादगाव वैजापूर(1), लक्ष्मीनारायण नगर, वैजापूर (1), दुर्गा नगर, वैजापूर (1), शरणापूर फाटा (1), सिल्लोड (1), कन्नड (5), खुलताबाद (2), वैजापूर (1), पैठण (1)

सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील 70 वर्षीय पुरूष, शहरातील जय भवानी नगरातील 70 वर्षीय स्त्री, जिल्हा सामान्य रुग्णालयात वडगावातील साईबन सोसायटीमधील 60 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयांमध्ये वैजापूर तालुक्यातील वाकला येथील 77 वर्षीय पुरूष, शहरातील बौद्धवाडा येथील 64 वर्षीय स्त्री, पैठण रोडवरील दक्षिण विहार येथील 54 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या