Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशइंधन दर कमी करा

इंधन दर कमी करा

नवी दिल्ली –

इंधन दर कमी करावेत अशी मागणी विरोधकांनी मंगळवारी लोकसभेत केंद्र सरकारकडे केली आहे.

- Advertisement -

देशाचत गेल्या नऊ महिन्यांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. या दराने आता उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सामान्यांना दिलासा देत इंधनाच्या दरात कपात करावी, अशी मागणी विरोधकांनी केली.

दिल्लीमध्ये पेट्रोलवर प्रती लिटर 38 रुपयांचा अबकारी कर, तर 19 रुपये मूल्यवर्धित कर आकारला जातो, असे वित्तीय विधेयक-2021च्या चर्चेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात आकारल्या जाणार्‍या अबकारी करात सरकारने कपात करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सरकारने पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करावे, अशी विनंती त्यांनी केली.

नफ्यातील सार्वजनिक कंपन्यांचे खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. बसपाचे खासदार राकेश पांडे यांनी इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित करताना, यामुळे गरीबांच्या खिशाला झळ पोहोचत असल्याचे सांगितले. टीआरएसचे खासदार नमा नागेश्वर राव यांनी इंधनाचे दर कमी करण्यासोबत कापसाच्या आयातीवरील शुल्कात कपात करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या