Saturday, September 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनिसाका यंत्रसामग्री चोरणार्‍यांवर गुन्हे नोंदवा; ऊस उत्पादक, सर्वपक्षीय नेत्यांचे पोलिसांना निवेदन

निसाका यंत्रसामग्री चोरणार्‍यांवर गुन्हे नोंदवा; ऊस उत्पादक, सर्वपक्षीय नेत्यांचे पोलिसांना निवेदन

- Advertisement -

निफाड | प्रतिनिधी Niphad

नाशिक जिल्हा बँकेतून पंचवीस वर्षाच्या करार भाडेतत्त्वावर घेतलेल्या परंतु स्वतःच मालक असलेल्या अविर्भावात शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून निसाका सुरू करण्याऐवजी त्यातील चांगली यंत्रसामग्री व भंगार कायदा हातात घेऊन विकणार्‍या बी. टी कडलग कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निफाड तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद व सर्वपक्षीय नेत्यांनी निफाड पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाई करावी, अशी मागणी केली.

निसाका विक्रीचा घातलेला घाट उधळून लावण्यासाठी निफाड तालुक्यातील सर्वपक्षीय नेतृत्व कार्यकर्ते एकवटले आहे. त्याचाच एक भाग म्हणून निसाकाची यंत्रसामग्री व भंगार विक्री करणार्‍या बी.टी कडलग कंपनी यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी निसाका संघर्ष समिती व कामगार संघटनेने निफाड उपविभागीय अधिकारी कांतीलाल पाटील यांच्याकडे केली.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, शिवसेना निफाड तालुकाप्रमुख तथा निफाड नगरपंचायत प्रभारी नगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, माज जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र मोगल, कामगार संघटना पदाधिकारी विजय रसाळ, सरचिटणीस बी.जी पाटील, प्रमोद गडाख, पिंपळस माजी सरपंच तानाजी पुरकर, नामदेव शिंदे, बाळासाहेब जाधव, जगन कुटे, अशपाक शेख, तेजेंद्र वाघ, नंदू कुशारे, सुभाष झोमन आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Pune News : दहीहंडीचा लोखंडी सांगाडा डोक्यात कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

0
पुणे । Pune राज्यभरात आज गोपाळकाल्याचा अन् दहीहंडीचा मोठा जल्लोष पाहावयास मिळत असतानाच, पुण्यातून एक अत्यंत वेदनादायी आणि काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना समोर आली आहे....