Wednesday, September 11, 2024
Homeनाशिक'इतक्या' फेरीवाल्यांची नोंदणी रद्द

‘इतक्या’ फेरीवाल्यांची नोंदणी रद्द

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राष्ट्रीय फेरीवाला धोरण योजनेअंतर्गत दर तीन महिन्यांनी होणारी शहर फेरीवाला समितीची बैठक मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत व्यवसाय न करणार्‍या 3 हजार 355 फेरीवाल्यांच्या नोंदणी रद्द करण्यात आल्या.

- Advertisement -

शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या फेरी व्यावसायिकांना निर्धारित जागेवर नोंदणी करून बसवण्याचे संकेत दिलेले होते. या अंतर्गत नाशिक शहरातील 10 हजार 619 फेरीवाल्यांपैकी 3 हजार 355 फेरीवाले हे व्यवसाय करीत नसल्याचे आढळून आल्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. उर्वरित 7259 फेरीवाल्यांना झोनमध्ये बसवण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.

विविध ठिकाणी नोंदणी नसलेले सुमारे 1337 नवीन व्यावसायिक फेरीवाले झोनमध्ये बसतात. अशा व्यावसायिकांना नोंदणी ओळखपत्र प्रमाणपत्र देण्याचा निर्णयही घेतला. या बैठकीला मनपा आयुक्त, अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे, बांधकाम विभाग, नगरविभाग, अतिक्रमण विभाग, विविध कर विभागांचे वरिष्ठ अधिकारी, सर्व विभागीय अधिकारी, पोलीस, वाहतूक शाखेचे अधिकारी व शहर सर्व शहरातील फेरीवाला समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

फेरीवाला झोन : 225 पैकी 131 कार्यरत

शहरात ठिकठिकाणी रस्त्यावरील व्यवसाय करणार्‍यांना एक जागी फेरीवाला झोनच्या माध्यमातून बसविण्यात आले होते. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी 225 फेरीवाला झोन उभारण्यात आले होते. त्यापैकी 131 फेरीवाला झोन सक्षमपणे कार्यरत असून, 11 झोन उभारणी गतिमान आहे. सुरुवातीला उभारण्यात आलेले महात्मा नगर व कुलकर्णी गार्डन येथील 2 हॉकर्स झोन रद्द करण्यात आले आहेत.

स्टेट बँक चौपाटी हॉकर्स झोन रद्द

राष्ट्रीय रस्ते महामार्गाने दिलेल्या सूचनेनुसार स्टेट बँक चौपाटीचा हॉकर्स झोन रद्द करण्याची मागणी नोंदवण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय फेरीवाला घेऊन समितीच्या मागील बैठकीत हा झोन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता कालच्या बैठकीत यांना ताज हॉटेल लगेचच्या भिंतीजवळ तात्पुरती व्यवस्था करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

फेरीवाला झोनमध्ये बसलेल्या व्यावसायिकांकडून प्रलंबित असलेली वसुली गतिमान करण्यात यावी, अनधिकृत ठिकाणी फेरीवाल्यांना बसू देऊ नये. नोंदणी असलेल्यांनाच फेरीवाला झोनमध्ये बसवावे.

– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त व प्रशासक मनपा

- Advertisment -

ताज्या बातम्या