Friday, May 16, 2025
Homeनगरसुनावणीला गैरहजर राहिल्याने एका आरोपीस दंड

सुनावणीला गैरहजर राहिल्याने एका आरोपीस दंड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

रेखा जरे हत्याकांडातील हैदराबाद येथील रहिवाशी असलेल्या चार आरोपींनी खटल्यातून दोषमुक्त करण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. या अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस गैरहजर राहिल्याने आरोपी जनार्दन अंकुला चंद्राअप्पा यास एक हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. उर्वरित तीन गैरहजर आरोपींना वॉरंट काढण्यात आले आहे.

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश रमेश गोसावी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. आरोपी जनार्दन अंकुला चंद्राअप्पा, शेख इस्माईल, अब्दुल रहेमान आणि राजशेखर चकाली (हैदराबाद) यांनी खटल्यामधून दोषमुक्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेले आहेत. या अर्जाच्या सुनावणीस आरोपी जनार्दन अंकुला चंद्राअप्पा गैरहजर राहिला होता. त्यामुळे त्यांना वॉरंट काढण्यात आले होते.

जनार्दन अंकुला हा न्यायालयात हजर झाल्याने त्यांचे वॉरंट रद्द करण्यात आले. त्याला एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास कठोर कारवाई करण्याची सक्त सूचना करण्यात आली. या अर्जातील तिघे गैरहजर राहिल्याने त्यांना वॉरंट काढण्यात आले. या अर्जावर पुढील सुनावणी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे अर्ज निकाली काढल्यानंतर दोष निश्चितीसाठी तारीख जाहीर होणार आहे. मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. सचिन पटेकर हे काम पाहत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाणी

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे...